आठ लाखाच्या लूट प्रकरणात पथक मध्य प्रदेशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:28 AM2021-03-13T04:28:34+5:302021-03-13T04:28:34+5:30
दोन विवाहित महिला बेपत्ता जळगाव : शिवाजी नगरातील इंद्रप्रस्थ नगर व कानळदा रस्त्यावरील रहिवासी असलेल्या दोन विवाहित महिला वेगवेगळे ...
दोन विवाहित महिला बेपत्ता
जळगाव : शिवाजी नगरातील इंद्रप्रस्थ नगर व कानळदा रस्त्यावरील रहिवासी असलेल्या दोन विवाहित महिला वेगवेगळे कारण सांगून घरातून बेपत्ता झालेल्या आहेत. एक महिला मंगळवारी सायंकाळी पाच वाजता आधारकार्ड घ्यायला जायचे सांगून घराबाहेर पडली तर दुसरी त्याच दिवशी रात्री ११ वाजता शौचास जाण्याचे सांगून घराबाहेर गेली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात हरविल्याच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत.
गोलाणी मार्केटमधून दुचाकी चोरी
जळगाव : ग.स.सोसायटीत कामानिमित्त आलेल्या दिनकर दत्तात्रय पाटील (रा.अहिरे बु.,ता.धरणगाव) यांच्या मालकीची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ ए.आर.१८६१) गोलाणी मार्केटमधून १० मार्च रोजी दुपारी १ वाजता चोरी झाली आहे. याप्रकरणी गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राध्यापिकेचा मोबाईल लांबविणाऱ्यास अटक
जळगाव : शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या नारायणी मधुकर गोसावी (३७) यांचा मोबाईल चोरुन नेणाऱ्या संकेत सुरेश काकडे (२५,रा.जुन्नर, जि.पुणे) याला एमआयडीसी पोलिसांनी पुण्यातून अटक केली. ३० नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजता गोसावी यांचा मोबाईल लांबविण्यात आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. हवालदार संजय भोई, नरसिंग पाडवी व सचिन पाटील यांच्या पथकाने संकेत याला अटक केली.
अपघाताच्या गुन्ह्यात हिंगोली पोलिसांकडून एकाला अटक
जळगाव : हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अपघाताच्या गुन्ह्यात रवींद्र सुरेश मोरे (४२,रा.कांचन नगर) या चालकाला हिंगोली ग्रामीण पोलिसांनी बुधवारी एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात अटकेची नोंद घेत पथक मोरे याला घेऊन हिंगोली येथे रवाना झाले.
वाहतूक शाखेतर्फे २३ रिक्षांवर कारवाई
जळगाव : शहर वाहतूक शाखेतर्फे मोहीम राबवून २३ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून कलम ६६/१९२ अन्वये कारवाई करुन रिक्षा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर यांनी दिली. बसस्थानक, कोर्ट चौक, गोलाणी मार्केट, टॉवर चौक व आकाशवाणी चौकात ही कारवाई करण्यात आली.