कुकुरमुंडा संस्थानचे श्री संतोजी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:45 AM2017-09-25T00:45:03+5:302017-09-25T00:45:31+5:30
‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘खान्देशातील संतांची मांदियाळी’ या सदरात प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांचा लेख.
कुकुरमुंडे येथील संस्थान नित्य देश आणि देव या तत्त्वांवर प्रीत करणारे होते. या संस्थानाने सतत लौकिक आणि अलौकिक अभ्युत्थानासाठी प्रय} केले. मानवताभिमुख राहून परलोकाचीही चिंता वाहिली. या परंपरेत मुख्यत: ब्रrाचारी पुरुषानेच गादी सांभाळण्याचा संकेत आहे. यातून सेवेचा एक पाठ शिकवला गेला. ज्ञानाच्या संदर्भातली अखंड जागरुकता हेही या संस्थानचे एक वैशिष्टय़ सांगता येईल. कुठल्याही प्रकारे चमत्कार वा अतक्र्य गोष्टी घडवून आणून लोकांना दिग्म्रमित करण्याऐवजी या संतांनी रोकडा धर्म विचार प्रतिपादित केला. ज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या संदर्भात देश ख्यात पंडितांशी प्रत्यक्ष वा पत्राच्या माध्यमातून सतत जागरुक चर्चा घडवून आणली. देशभर एक नवजागरणाचे चित्र होते. या चित्रात यांनी आपल्या परीने अभिनव रंग भरले. संपूर्ण समाज जीवन ढवळून निघाले होते. अशा काळात केवळ आपल्याच कार्यात व वैयक्तिक मोक्षसाधनेची चिंता करण्याऐवजी या संस्थानाने समाजाचे अंतर्मन सुचिभरूत करण्याकामी अपार कष्ट उपसले होते. एका नव्या समाज निर्मितीचे स्वप्न उरीशिरी जोपासले होते. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना आपल्या सोबत घेऊन कसे चालता येईल, या संदर्भात सततची चिंता वाहिली होती. केवळ नामस्मरण वा जपजाप्य यासारख्या पारंपरिक कर्मकांडांचा अवलंब न करता ख:या धर्म स्वरूपाची कास धरली. मोठय़ा प्रमाणावर समाजाचे प्रबोधन करण्याचा वसा घेतला होता. ठिकठिकाणी मठ आणि मंदिरांची स्थापना करून जणांची सोय लावली. पंढरपूर ही तर भक्तीची पेठच. तिथे खानदेशातील वारक:यांसाठी फार मोठी सोय करून देण्याचे काम आणि यानिमित्त संस्थानने केलेले प्रय} विशेषच म्हणावे लागतील. समाजसन्मुख असण्याचा एक फार मोठा प्रयोग कुकुरमुंडा संस्थानने केला. विद्येला विवेकाने मंडित केले. ज्ञानाला सेवेचे कवच चढवले. जगण्याला नैतिकतेचा परीस स्पर्श घडवून दिला. समाजात सर्वत्र शुद्ध आचरणाचा पाठ शिकवला. ब्रrाचर्य हे केवळ पोथीतले न राहू देता या परंपरेने एका नव्य आणि भव्य वारशाची पेरणी केली. कुकुरमुंडा परंपरेत अतिशय महत्त्वाचे नाव संतोजी यांचे आहे. यांचा वंशवृक्ष असा आहे- संतोजी महाराजांचे पिता नित्याराम त्रिवेदी आणि माता लाडकाबाई. त्यांचे दोन पुत्र उत्तमराव त्यांची प}ी रूपकौर दुसरा मुलगा काशिराम ब्रrाचारी होते. उत्तमराव यांना चार पुत्र. विठ्ठलराम त्याची पतनी रुक्मिनी, शंकर त्यांची पत्नी मोतन, संतोजी ब्रrाचारी होते, सनातन त्यांची प}ी ललिता तर उद्धव ब्रrाचारी होते. विठ्ठलराम आणि रुक्मिणी यांचे मधुसूदन, माधव, विष्णू आणि जनार्दन हे चार पुत्र. यापैकी माधव यांचे निलेशकुमार आणि समीर हे दोन पुत्र होत. शंकर आणि मोतन यांचे चार पुत्र. नरहरी, सीताराम. गोपाळ आणि वासुदेव. सनातन आणि ललिता यांचे चार पुत्र असे गोविंद महाराज ब्रrाचारी, भानुदान, एकनाथ आणि पुंडलिक. संतोजींचे पारंपरिक शिक्षण अल्प होते. मुल्हेरचे सुप्रसिद्ध पंडित केशवजींनी त्यांना शिक्षण दिले. ते समासचक्र, रूपावली शिकले. केशवजींच्या निर्वाणानंतर त्यांचे सुपुत्र रामभाईंनी संतोजींच्या अध्ययनाची जबाबदारी स्वीकारली. भारतभर संपर्क साधून त्यांनी पंडित मैत्री संपादन केली. ज्ञाननिष्ठांची मांदियाळी जमवली. संतोजींपासूनच प्रेरणा घेऊन सोनगीरच्या केशवदत्तांनी 1924 साली अखिल भारतीय विद्वान परिषद भरवली. कुकुरमुंडासारख्या ग्रामीण परिसरात राहून स्थान वा साधनांची तक्रार न करता महाराजांनी देशभर एक जागता संवाद राखला होता. पत्रांमधून देशसमस्येवर प्रदीर्घ चर्चा केली होती. कलकत्ता येथील ‘भारत’ आणि काशी येथील ‘पंडित’ यासारख्या प्रथितयश वृत्तपत्रांमधून त्यांनी लेखन केले. चर्चा घडवून आणल्या. लोकमान्य टिळक यांच्याशीही त्यांची भेट झाली होती. अस्पृश्योद्धार करून पूर्वास्पृश्यांना स्पृश्य करून घेता येईल काय? हा क्रांतिदर्शी विचार त्यांनी त्या काळात शास्त्राधारे मांडण्याचा प्रय} केला. पुण्याचे सुप्रसिद्ध तपस्वी श्री अण्णासाहेब पटवर्धन यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. विपूल ग्रंथलेखन केले. उदंड प्रवास केला. अनेकांशी वादविवाद केला. त्यांच्या सुप्रसिद्ध ग्रंथात पंचस्थळी, सनातन धर्म प्रदीप, धर्मादर्श, सनातन धर्मोज्जीवन संस्थेने काय केले? या ग्रंथांचा समावेश होतो. या लेखनाकडे केवळ दृष्टिक्षेप टाकला तरी यातले वैविध्य आणि सर्वस्पर्शीत्त्व ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही. मनाशी एक जाज्वल्य ध्येयनिष्ठा असली म्हणजे माणूस कुठल्याही संकटावर मात करू शकतो, ही व्यावहारिक खूणगाठ महाराजांनी आपल्या मनाशी तर बांधलीच पण परिसरालाही शिकवली होती. त्यांनी महात्मा गांधीजी आणि मदन मोहन मालवीय यांच्यासारख्या देशख्यात नेत्यांशी नित्याचा पत्रसंवाद राखला होता. या ऐतिहासिक पत्रव्यवहाराचे नमुने आपण पुढल्या लेखातून वाचू या. यातून त्यांच्या प्र™ोचा परिचय होतो.