दिल्लीतील हैकाथॉन स्पर्धेत एसएसबीटीने पटकविले तिसरे स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 08:04 PM2019-11-18T20:04:26+5:302019-11-18T20:26:13+5:30
जळगाव - दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या आॅल इंडिया मोमी हैकथॉन स्पर्धेत बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयाने तिसरे स्थान पटकावून पारितोषिक ...
जळगाव- दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या आॅल इंडिया मोमी हैकथॉन स्पर्धेत बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयाने तिसरे स्थान पटकावून पारितोषिक मिळविले.
स्पर्धेत संपूर्ण देशातून १४० अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये एसएसबीटीच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांच्या संघाचा समावेश होता़ संपूर्ण फेऱ्या चुरशीच्या झाल्या़ प्रथम फेरीमध्ये कमाल इ-चार्जिंगचा वापर या शोध प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले़ नंतर अंतिम फेरीमध्ये शोध प्रकल्पाचे सादरी करण व प्रश्नमंजुषा कार्यक्रम झाला़ यामध्ये एसएसबीटीच्या तृतीय क्रमांक पटकाविले़ पारितोषिक म्हणून दहा हजार रूपयांचे बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आले़ अमित पाटिल, हेमलता टाक, ऋतिक माहुरकर, खिलेश भंगाले, गौरी मूंदड़ा हे विद्यार्थी या पुरस्काराचे मानकरी ठरले. यश मिळविल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत, विभाग प्रमुख डॉ. यु. एस. भदादे आदींनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.