एसएसबीटीच्या विद्यार्थ्यांनी पटवून दिले स्वच्छतेचे महत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 03:36 PM2020-02-01T15:36:38+5:302020-02-01T15:36:50+5:30
स्वच्छता पंधरवडा : विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण
जळगाव- बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयात १६ ते ३१ जानेवारी या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला. या मोहितंर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसह पर्यावरणाचे महत्व तरूणाईला पटवून दिले़ दरम्यान, स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना सुध्दा मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
१६ जानेवारीला स्वच्छतेची शपथ घेऊन या पंधरवाडयाची सुरुवात झाली़ त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के़एस. ाणी, उपप्राचार्य डॉ. एस.पी. शेखावत, प्रा. एन.के. पाटील, प्रा. कृष्णा श्रीवास्तव, प्रा. एम. व्ही. रावलानी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते़ स्वच्छतेची प्रतिज्ञा प्रा.प्रवीण पाटील दिली़ त्यानंतर दुसऱ्या दिवशी १७ जानेवारी वृक्ष लागवड करण्यात आली. त्यानंतर स्वच्छतेसंदर्भात विविध स्पर्धा घेण्यात आल्या़ त्यामध्ये आकर्षक घोषणा तसेच पोस्टर बनवण्याचे स्पर्धा यासह विविध स्पर्धांचा समावेश होता़ २५ रोजी महाविद्यालयातील वस्तीगृह व स्टाफ क्वार्टर्स मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले़ तसेच विद्युत अभियांत्रिकी विभागाने 'वनसंवर्धन' या विषयावर पोस्टर स्पर्धा घेतली़ २७ रोजी यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाने टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याची स्पर्धा घेतली़.
यांनी मारली बाजी
- स्वच्छता विषयावर घोषणा स्पर्धा : प्रथम पल्लवी निकम तर द्वितीय तेजस पाटील
- स्वच्छता विषयावर पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा : प्रथम सागर सपकाळ तर द्वितीय शरयू चोपडेकर
- जलसंवर्धन विषयावर घोषणा स्पर्धा : प्रथम संपदा पवार तर द्वितीय पूजा पाटील
- जलसंवर्धन विषयावर पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा : प्रथम नयना पाटील तर द्वितीय रिता पाटील, तुषार पाटील
- जलसंवर्धन विषयावर भाषण स्पर्धा : प्रथम राखी मालू तर द्वितीय पूजा पाटील
- वनसंवर्धन विषयावर पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा : प्रथम राणी चव्हाण, पूनम घाईत तर द्वितीय जयश्री सपकाळ, किर्ती कोळी
- टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा : प्रथम ग्रुप प्रवीण सोनवणे, अखलाख पटवे, रोहित धंद्रवे, प्रितेश चौधरी, सौरभ घोडके, सैफ देशमुख तर द्वितीय ग्रुप रुपांक राजपूत, स्वप्निल पाटील, रुतुजा पाटिल.