SSC Exam : दहावीचा पेपर फुटला, प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 02:35 PM2020-03-03T14:35:43+5:302020-03-03T14:36:00+5:30

SSC Exam : अवघ्या 15 मिनिटांतच मराठीची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर फिरू लागली आणि पहिल्याच पेपरला पेपर फुटीची बाधा उघडकीस आली आहे.

SSC Exam SSC Marathi Paper leak in jalgaon SSS | SSC Exam : दहावीचा पेपर फुटला, प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल

SSC Exam : दहावीचा पेपर फुटला, प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल

googlenewsNext

मुक्ताईनगर, जि.जळगाव - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक नाशिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. मराठीचा पहिला पेपर असताना कुऱ्हा ता. मुक्ताईनगर येथे अवघ्या 15 मिनिटांतच मराठीची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर फिरू लागली आणि पहिल्याच पेपरला पेपर फुटीची बाधा उघडकीस आली आहे.

पहिल्याच पेपरला अवघ्या 15 मिनिटांत पेपर फुटीचा धक्कादायक प्रकार  व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून दिसून आला.  खऱ्या अर्थाने अवघ्या 20 व्या मिनिटाला हे पेपर फुटीचे बिंग फुटले ते  या गावातील काही झेरॉक्स सेंटरवर उत्तरांची कॉपी झेरॉक्स करण्यासाठी आल्यामूळे.  कुऱ्हा येथे हा प्रकार घडल्याने पेपर फुटी नेमकी कुऱ्हा परीक्षा केंद्रावरून विदयार्थ्यांने व्हॉट्सअ‍ॅपवर टाकले की अन्य ठिकाणावरून हे पेपर व्हायरल झाले हा प्रश्न अनुत्तरित आहे.

दरम्यान याबाबत कुऱ्हा येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयातील 10 वी परीक्षेचे केंद्र संचालक आर जे कौलकार यांचाशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की विद्यार्थ्यांना वेळेवर 10 वाजून 50 मिनिटांनी प्रश्नपत्रिका देण्यात आली. 11 वाजता त्यांनी उत्तरपत्रिका लिहण्यास सुरुवात केली, परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी मोबाईल आणू नये याची दक्षता अगोदरच घेण्यात आली. त्यामुळे या केंद्रावरून प्रश्नपत्रिका फुटली असे सांगता येणार नाही. जर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका फिरत असेल आणि त्या विद्यार्थ्यांचा नंबर असेल तर निश्चितच कायदेशीर कारवाई केली जाईल.


महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi: अखेर, नरेंद्र मोदींनी सस्पेन्स संपवला, 'सोशल संन्यासा'बाबत केला खुलासा

महाविकास आघाडीत पुन्हा मतभेद; मंत्री सांगतात एक, तर मुख्यमंत्र्यांचा वेगळाच दावा

Narendra Modi: भाजपा खासदारांच्या बैठकीत नरेंद्र मोदी भावूक; देशाबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...

मोदींनी सोशल मीडिया सोडू नये, अन्यथा...; संजय राऊत यांचा खोचक टोला

Narendra Modi : ...म्हणून मार्क झुकेरबर्ग यांनी मोदींसाठी बदलला होता आपला प्रोफाईल फोटो

 

Web Title: SSC Exam SSC Marathi Paper leak in jalgaon SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.