पाचोरा गिरड रोडवर एसटी बस कारचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 03:13 PM2019-07-12T15:13:56+5:302019-07-12T15:16:12+5:30
पाचोरा-गिरड रोडवर कार व एसटी बसची जोरदार धडक होऊन कारमधील दोन जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले असून, बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास झाला. कारमधील प्रवासी पिंपळगाव हरेश्वर येथे समर्थ गोविंद महाराजांच्या दर्शनासाठी जात होते.
पाचोरा, जि.जळगाव : पाचोरा-गिरड रोडवर कार व एसटी बसची जोरदार धडक होऊन कारमधील दोन जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले असून, बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास झाला. कारमधील प्रवासी पिंपळगाव हरेश्वर येथे समर्थ गोविंद महाराजांच्या दर्शनासाठी जात होते.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, पाचोºयाहून एरंडोलकडे जाणाºया बसची एरंडोलकडून पिंपळगाव हरेश्वर येथे दर्शनासाठी येत असलेल्या कार गाडी (एमएच-२०-७६७८) या गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात कार चालक (मालक) बापू रघुनाथ मराठे (वय ४९, रा.एरंडोल), परी दत्तात्रेय पाटील (वय आठ वर्षे) ठार झाली. कारमधील गौरव बापू मराठे (वय १९), सरला बापू मराठे (वय ३८) दोघे रा.एरंडोल, रेखा दत्तात्रेय पाटील (वय ३६), ओम दत्तात्रेय पाटील (रा.धरणगाव) गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय मयुरी दत्तात्रेय पाटील किरकोळ जखमी आहे. बसमधील सात प्रवासी यात भारती सुधीर पाटील (हनुमंतखेडेसीम), मीना सुरेश जाधव (पहूर), दिनकर विष्णू पाटील (हनुमंतखेडेसीम) सुभाषचंद्र कन्हैयालाल समदाणी, (पाचोरा), वनसिंग युवराज सरदार (कनाशी ), जायदा इब्राहिम मणियार (भातखेडे), शाहीस्ताबी सय्यद रमजान हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. गंभीर जखमींना येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. यावेळी जखमींना ओझर, गिरड येथील शेतकरी व कार्यकर्त्यांनी मदत केली. एसटीमधील किरकोळ जखमी प्रवाशांना एसटीमार्फत आगार व्यवस्थापक देवेंद्र वाणी यांनी तातडीची मदत एक हजार रुपये देण्यात आले.