अमळनेर, शिंदखेडा व सुरतसाठी एसटीच्या जादा बसेस
By Admin | Published: May 26, 2017 12:31 PM2017-05-26T12:31:53+5:302017-05-26T12:31:53+5:30
रेल्वे रद्द झाल्याने हाल : रावेर, चोपडा, यावल येथून वाढीव बसफे:या
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.26 - पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळाच्या दुहेरीकरणामुळे काही पॅसेंजर रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. या पाश्र्वभूमीवर एसटी महामंडळानेही सुरत, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा या भागात बस फे:या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
रावेर येथून नवीन बससेवा सुरु
रावेर येथून सुरत येथे बुधवारी सायंकाळीच नवीन बससेवा सुरू झाली. तर चोपडा, यावल येथूनही शिंदखेडासाठी बस सुरू करण्याच्या सूचना दिल्याची माहिती एसटीच्या विभाग नियंत्रक चेतना खिरवडकर यांनी दिली.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील युवक, नागरिक गुजरातमध्ये नोकरीनिमित्त स्थिरावले आहेत. सुरत, बडोदा, अहमदाबाद, गांधीनगर्पयत प्रवासी जातात. त्यासाठी रेल्वे हीच एकमेव सुकर प्रवास व्यवस्था असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी रेल्वेने जाण्यासाठी होते. पण सुरत भुसावळ पॅसेंजर (येणारी व जाणारी) फास्ट सुरत भुसावळ पॅसेंजर फक्त नंदुरबार ते भुसावळ दरम्यान धावणार आहे. तर इतर पॅसेंजर व अमरावती फास्ट पॅसेंजरही रद्द झाली आहे. तसेच इतर एक्सप्रेस गाडय़ांचे थांबे बदलले आहेत.
11 जूनर्पयत या रेल्वे गाडय़ा रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. पण प्रवाशांना ये जा करण्यासाठी शेवटी एसटी बसचा मोठा आधार आहे. सुरतर्पयत जाणा:या बसची संख्या कमी आहे. गुजरातमधील परिवहन मंडळातर्फे एसटी बसना तेथील आगारात किंवा बसस्थानकात उभे राहण्यासाठी जागा दिली जात नाही. त्यामुळे सुरत येथे एसटी बस पाठविण्यासंबंधी एसटी महामंडळातर्फे गुजरातमधील परिवहन विभागाशी चर्चा केली जाणार आहे.
ज्या बस आगारात एसटी बसची मागणी येईल, त्या बस आगारातून संबंधित ठिकाणी बस सोडली जाईल. यावल, चोपडा येथून शिंदखेडा, दोंडाईचार्पयत बस सोडल्या जात आहेत. तसेच इतर आगारांमधूनही बडोदा, सुरत येथे बस सोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
-चेतना खिरवडकर, विभाग नियंत्रक, जळगाव