भडगाव तालुक्यातील पांढरद फाट्यावर एसटी बसेस रोखल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 04:43 PM2019-07-24T16:43:56+5:302019-07-24T16:45:22+5:30
तालुक्याच्या ठिकाणावरुन गिरणा काठालगतच्या पांढरद येथे सुरू असलेल्या एसटी बसेस या नेहमीच उशिराने धावतात. यामुळे बुधवारी दुपारी संतप्त झालेल्या विद्यार्थी व ग्रामस्थांनी एरंडोल-येवला राज्यमार्गावरील फाट्यावर एसटी बसेस अडविल्या.
खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : तालुक्याच्या ठिकाणावरुन गिरणा काठालगतच्या पांढरद येथे सुरू असलेल्या एसटी बसेस या नेहमीच उशिराने धावतात. यामुळे बुधवारी दुपारी संतप्त झालेल्या विद्यार्थी व ग्रामस्थांनी एरंडोल-येवला राज्यमार्गावरील फाट्यावर एसटी बसेस अडविल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करीत बससेवा सुरळीत केली.
यासंदर्भात वृत्त असे, की पांढरद येथे भडगाव येथून पाचोरा आगाराच्या चार बसफेºया सुरू आहेत. सकाळी सातला, अकराला, दुपारी एकला व सायंकाळी साडेपाच असे वेळापत्रक आहे. असे असताना शालेय वेळेत असणारी अकराची बस ही उशिरात उशिरा बारा वाजता गावी येते. याचप्रमाणे सायंकाळची बस वेळेपेक्षा आधी भडगाव येथून सोडण्यात येते. त्यामुळे एकतर विद्यार्थ्यांच्या तासिका बुडतात. नाहीतर ८-१० कि.मी. पायी भडगावहून पांढरदला यावे लागते. कधी -कधी सायंकाळची बस रात्री येते. जवळजवळ ५०-६० मुले व मुली भडगावी शिकतात. बुधवारी एसटी बसची अकराची वेळ होऊनही ती न आल्याने संतप्त विद्यार्थी, ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ यांनी दोन कि.मी.वर फाट्यावर येत प्रथम आडळसे-भडगाव बस अडवली. यानंतर उशिरा आलेली पांढरद बसदेखील रोखली. पोलिसांना खबर लागल्यानंतर त्यांनी पांढरद फाट्यावर येत बससेवा सुरळीत केली. ग्रामस्थांशी चर्चा केली. यानुसार जिल्हाधिकारी, तहसीलदार, भडगाव पोलीस स्टेशन, पाचोरा आगार व भडगाव स्थानक प्रमुखांना निवेदने दिली.
दरम्यान, ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे, की पांढरद येथील एसटी बसेस या अनियमित धावतात. कधी-कधी बसफेरी मनमानीपणे बंद करण्यात येतात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर ग्रामस्थांची गैरसोय होते. वरील दिलेल्या वेळेत बसफेºया नियमीत सुरु न झाल्यास २९ जुलै रोजी तहसील कचेरीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भडगाव स्थानकप्रमुखांवर रोष
‘लोकमत’ प्रतिनिधीने पांढरद फाट्यावर या विद्यार्थ्यांची भेट घेतली. बसेस वेळेवर धावत नसल्याने, याविषयी बस केव्हा लागणार? आदी चौकशी भडगाव स्थानकप्रमुखांकडे करावी तर ते पहिल्याच झटक्यात उडवून लावतात. व्यवस्थित उत्तर किंवा समाधान करीत नाहीत. असंबद्ध बोलतात, असा एकूणच मोठा रोष विद्यार्थिनी, विद्यार्थी व पालकवर्गाचा दिसून आला. बस अडवून झाल्यानंतर भडगाव पोलिसात आज हे विद्यार्थी निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांनी वरील प्रकार सांंिगतला. मात्र पोलीस भडगाव स्थानक प्रमुखांकडे हे जाणून घेण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी तेथून आधीच काढता पाय घेतल्याने पोलीस माघारी आल्याचे ग्रामस्थांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यांना नंतर बोलावणार असल्याची माहिती ुमिळाली.