रक्षाबंधनला एसटीची ४ कोटींची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:21 AM2021-08-28T04:21:19+5:302021-08-28T04:21:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यंदा १५ ऑगस्ट पासून शासनाने सर्वत्र अनलॉक केले. एस.टी. महामंडळातर्फे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पूर्ण क्षमतेने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यंदा १५ ऑगस्ट पासून शासनाने सर्वत्र अनलॉक केले. एस.टी. महामंडळातर्फे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पूर्ण क्षमतेने बसेस सोडल्यामुळे जळगाव विभागाने पाच दिवसात चार कोटींचे उत्पन्न मिळविले आहे. यात सर्वाधिक उत्पन्न हे जळगाव आगाराने मिळविले आहे. त्या खालोखाल जामनेर व चाळीसगाव आगाराने चांगली कमाई केली आहे.
१५ ऑगस्ट नंतर `रक्षाबंधन `हा पहिलाच सण आल्यामुळे जिल्ह्यातील सर्व आगारांतर्फे नाशिक, पुणे, औरंगाबाद, धुळे, सुरत व सर्वाधिक उत्पन्न मिळणाऱ्या स्थानिक मार्गांवर दर तासाला बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे रक्षाबंधनाच्या २१ ते २५ ऑगस्टच्या कालावधीत महामंडळाच्या जळगाव विभागाने ४ कोटींच्या घरात उत्पन्न मिळविले आहे.
कोट
रक्षाबंधनात सर्व मार्गांवर जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले होते, त्यामुळे ४ कोटींच्या घरातील उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे उत्पन्न वाढीसाठी विभागीय वाहतूक अधिकारी, सर्व आगारांचे वाहतूक अधीक्षक, आगार व्यवस्थापक, चालक-वाहक व इतर सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळाले आहे.
भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग, एसटी महामंडळ