एसटीचा मुक्ताईनगरात चक्काजाम

By Admin | Published: January 19, 2017 12:16 AM2017-01-19T00:16:53+5:302017-01-19T00:16:53+5:30

पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद : अंतुली-मुक्ताईनगर बसच्या वाहकास बस थांबवून मारहाण

ST at Muktainanagar | एसटीचा मुक्ताईनगरात चक्काजाम

एसटीचा मुक्ताईनगरात चक्काजाम

googlenewsNext

मुक्ताईनगर : तालुक्यातील अंंतुर्ली फाट्यावर एकाने बस अडवून चालकास मारहाण केल्याची घटना १८ रोजी सकाळी सहा वाजता घडली. त्यामुळे संतप्त कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन करुन एसटीचा चक्का जाम केला.
दरम्यान, चालकाच्या फियार्दीवरुन  आरोपीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. परंंतु जोपर्यंंत चालकास मारहाण करणाºया आरोपीस  अटक होत नाही. तोपर्यंंत कामगारांंनी चक्का जाम आंंदोलनाचा पवित्रा  घेतल्याने तब्बल साडेतीन तास प्रवाशाना ताटकळत थांंबावे लागले.
याबाबत मुक्ताईनगर आगारातील अंंतुर्ली-मुक्ताईनगर मुक्कामी बस   सकाळी सहा वाजता अंंतुर्ली येथून मुक्ताईनगरकडे मार्गस्थ झाली. मात्र अचानक ६:१० वाजता अंंतुर्ली फाट्यावर बसच्या मागुन दुचाकीने  पाठलाग करीत सुनील जगन्नाथ चौधरी या इसमाने रस्त्यावर बससमोरच दुचाकी आडवी करुन बसचालक व्ही.व्ही बडगुजर यांंना शिवीगाळ करीत मारहाण केली. अचानक झालेल्या मारहाणीमुळे घाबरलेल्या बडगुजर यांंनी मुक्ताईनगरला सहकारी कर्मचाºयांंना घडलेली घटना भ्रमणध्वनीद्वारे कळविली.दरम्यान एकाच महिन्यात बस चालक व वाहकांंना मारहाणीच्या प्रकरण वाढल्यामुळे एस.टी. कामगार संंघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद धायडे यांंनी जोपर्यंंत आरोपीस अटक होत नाही तोपर्यंंत  बस आगार व बस स्टॅँंड आवारात चक्का जाम आंंदोलनाचा पवित्रा घेतला. सकाळी ६:३० वाजेपासून थेट १०  वाजेपर्यंंत म्हणजे तब्बल साडेतीन तास चाललेल्या या आंंदोलनामुळे सकाळी प्रवास करणारे शासकीय कर्मचारी, विद्यार्थी शिवाय  इतर प्रवाशांंची प्रचंंड गैरसोय झाली.
दरम्यान   आंंदोलनावेळी बडगुजर यांंच्या फियार्दीवरुन मुक्ताईनगर पोलिसात सुनील जगन्नाथ चौधरी याच्याविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन इंंगळे हे करीत आहे.  तब्बल साडेतीन तास चाललेल्या आंंदोलनाची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख चंंद्रकांंत पाटील यांंनी आंंदोलनकर्ते एस.टी.कामगारांंची भेट घेवून  चक्काजाम आंंदोलन थांंबविण्याचे आवाहन केले. कामगारांंनीही    प्रतिसाद देत   सकाळी दहा वाजता आंंदोलन स्थगित करुन प्रवाशांंच्या सेवेत दाखल झाले. 
एस.टी. कामगार संंघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद धायडे यांंच्यासह बी.आर खान, एन.जी देशमुख, एम.जी.काळे, एस.पी नायसे, कैलास वंंजारी, राहुल खोसे, व्ही.डी. ठाकरे, एन.पी.पाटील, ए.टी.पाटील यांंच्यासह असंंख्य कामगार उपस्थित होते.यांंच्यासह असंंख्य कामगार उपस्थित होते. दरम्यान वारंंवार कर्मचाºयांंना मारहाणीचे प्रकार वाढल्याने कर्मचाºयांंच्या सुरक्षेची समस्या उद्भवत असल्याची भावना   कर्मचाºयांंनी बोलून दाखविली. (वार्ताहर)
क्षुल्लक कारणावरुन कामगारांना मारहाण करण्याची प्रवृृत्ती वाढीस लागली. मारहाण करणाºयांंना राजकीय पाठबळ दिले जाते व वादावर पडदा पडतो. परंंतु मारहाणीच्या प्रकारांंमध्ये वाढ होत आहे.हे प्रकार न थांंबल्यास आमरण उपोषण केले जाईल.
- प्रमोद धायडे,
एस.टी कामगार संंघटना
जिल्हा उपाध्यक्ष

Web Title: ST at Muktainanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.