शालेय आरोग्य तपासणी पथकाच्या फिरस्तीसाठी एसटीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:56 PM2017-09-29T23:56:38+5:302017-09-29T23:57:14+5:30
प्रतिसाद मिळत नसल्याने अट काढली
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 29 - राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत शालेय विद्याथ्र्याच्या आरोग्य तपासणीसाठी असलेल्या पथकांच्या वाहनांची निविदा प्रक्रिया अद्यापही पूर्ण न झाल्याने आता या पथकासाठी एसटी बस व खाजगी वाहनांचा आधार घेतला जात आहे. पथकाला या वाहनांनी पाठविण्यासाठी तसेच त्यांचे बिल अदा करण्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना पत्र दिले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र सरकारच्यावतीने अंगणवाडी, शाळा, आश्रमशाळांमधील 16 वर्षे वयोगटार्पयतच्या विद्याथ्र्यांच्या आरोग्य तपासणीसाठी राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम राबविला जातो. यासाठी जळगाव जिल्ह्यात 40 पथके आहेत. या पथकाला देण्यात येणारे वाहन कंत्राटी पद्धतीवर लावले जातात. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात लावण्यात आलेल्या वाहनांचा कंत्राट एप्रिल महिन्यातच संपला. मात्र निविदा न काढल्यामुळे संबंधित कंत्राटदाराला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. ती मुदतदेखील 31 ऑगस्ट रोजी संपली.
आरोग्य तपासणीचे वाहने थांबल्यानंतर आलेल्या दोन निविदा उघडण्यात आल्या ख:या मात्र त्याही रद्द कराव्या लागल्या. त्यानंतर लघु निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र यातील प्रति कि.मी.च्या अटीमुळे निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता ही अट काढून टाकली आहे. त्यामुळे अट काढल्यानंतर आता नव्याने निविदा येणार आहे.
मात्र ही प्रक्रिया पूर्ण होणे व यशस्वी होईर्पयत या पथकांना त्या त्या स्तरावरून सार्वजनिक वाहने, ज्यामध्ये एसटी बस, रेल्वे यांचा तसेच खाजगी वाहनांचा आधार घेत शालेय आरोग्य तपासणी करण्याविषयी सूचित करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, कुटीर रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांना पत्र दिले आहे. या फिरस्तीचे प्रत्यक्ष खर्चाचे बिल अदा करण्याचे व तपासणी अहवालही सादर करण्याचे सूचित केले आहे.
निविदांमधील अटीमुळे त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने अट काढून टाकली आहे. निविदा पूर्ण होईर्पयत एस.टी., खाजगी वाहनांनी पथकाने प्रवास करण्याविषयी कळविण्यात आले आहे.
- डॉ.एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.