कक्षासाठी जनआधारचा पालिकेत ठिय्या

By admin | Published: March 9, 2017 11:51 PM2017-03-09T23:51:37+5:302017-03-09T23:51:37+5:30

मुख्याधिका:यांच्या नेम प्लेटला हार : नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्षांविरोधात जोरदार घोषणाबाजी

Stab | कक्षासाठी जनआधारचा पालिकेत ठिय्या

कक्षासाठी जनआधारचा पालिकेत ठिय्या

Next

भुसावळ : पालिकेतील विरोधी पक्षाच्या गटनेत्याची कॅबिनला लावलेली नेमप्लेट काढून ती कॅबिन बालकल्याण समिती सभापतींना दिल्याच्या निषेधार्थ जनआधार विकास पार्टीतर्फे पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिका:यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली़
दरम्यान, आंदोलनकत्र्यानी मुख्याधिका:याच्या नेमप्लेटला हारही घालूना अनोखी गांधिगिरी करीत आंदोलन केल्याने पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली़
प्रवेशद्वारावरच मांडला ठिय्या
महिला व पुरुष आंदोलनकत्र्यानी पालिकेच्या प्रवेशद्वारावरच गुरुवारी दुपारी ठिय्या मांडून संताप व्यक्त केला़ नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी तसेच मुख्याधिकारी बी़टी़बाविस्कर यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली़ आंदोलनकत्र्यानी पांढ:या टोप्या घालून उपस्थितांचे लक्षही वेधल़े
जनआधार विकास पार्टीचे 19 नगरसेवक निवडून आले असून भुसावकरांनी तब्बल 36 हजार मतांचा जोगवा दिला आह़े विरोधी पक्षाच्या गटनेत्याला कॅबिन नसल्याने रस्त्यावर बसून समस्या सोडवायच्या का? असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला़ स्वतंत्र दालन उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला़
ठिय्या आंदोलात जनआधारचे गटनेता उल्हास पगारे, माजी नगरसेवक जगन सोनवणे, नगरसेविका संगीता देशमुख, सचिन भास्कर पाटील, नितीन धांडे, हाजी शेख जाकीर सरदार, जीवन दत्तु अहिरे, पवन नासे, नितीन नासे, पुष्पा जगन सोनवणे, रवी सपकाळे, इम्रान बागवान, नसीम तडवी, छोटू निकम, संजय जाधव, राहुल तावरे, गोटू सोनार, राजेश बहिरुने, शेख समीर, शुभम करडे, राहुल पाटील, अमोल कोळंबे, हरीश सुरवाडे, सत्तार कुरेशी आदींची उपस्थिती होती़
कुठलाही अधिकार नसताना संबंधितानी पालिकेच्या कर्मचा:यांना धाक दाखवून पालिकेतील कॅबिन बळकावली होती़ रितसर पंचनामा करून ते कॅबिन महिला बालकल्याण सभापतींना देण्यात आले आह़े
-बी़टी़बाविस्कर,
 मुख्याधिकारी, भुसावळ ऩपा़
महिलादिनाचे औचित्य साधून मुख्याधिका:यांनी पंचनामा करून महिला बालकल्याण सभापतींना दालन उपलब्ध करून दिल़े जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले असते तर अधिक बरे झाले मात्र  प्रसिद्धी मिळवण्याचा हा खटाटोप आह़े
-युवराज लोणारी,
उपनगराध्यक्ष

Web Title: Stab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.