समांतर रस्त्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे
By admin | Published: January 5, 2017 12:29 AM2017-01-05T00:29:38+5:302017-01-05T00:29:38+5:30
जळगाव : समांतर रस्त्याच्या रेंगाळलेल्या प्रश्नावर तोडगा निघावा म्हणून महापालिकेकडून गुरूवारी जिल्हादौºयावर येत असलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले जाणार आहे
जळगाव : समांतर रस्त्याच्या रेंगाळलेला प्रश्न व उड्डाणपुलाचे काम या प्रश्नावर तोडगा निघावा म्हणून महापालिकेकडून गुरूवारी जिल्हादौºयावर येत असलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले जाणार आहे. समांतर रस्ता व पुलांच्या कामासाठी मदत मिळावी असे साकडे त्यांना घातले जाणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. मात्र पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने तातडीने त्यावर निर्णय होण्याची अपेक्षा मात्र मावळली आहे.
समांतर रस्त्याच्या विषयावर मनपा पदाधिकाºयांनी यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा कालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. समांतर रस्त्यांच्या कामांसाठी तसेच इतर रेंगाळेल्या विषयात मदतीचे मंत्र्यांनी आश्वासनही दिले होते.
महामार्ग मृत्यूचा सापळा
महामार्गावरील रहदारी गेल्या काही वर्षात प्रचंड वाढली आहे. प्रत्येक क्षणाला मोठमोठी अवजड वाहने या रस्त्यावरून येत-जात असतात. जळगाव शहराची दोन भागात विभागणी आहे. शहराचा एक मोठा भाग हायवेच्या पुढे आहे. त्यामुळे लाखो लोकांना रोज महामार्ग ओलांडून जाण्याशिवाय पर्याय नसतो.
बºयाच वेळेस घाईत महामार्ग ओलांडत असताना अपघातही होत असतात. या अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने समांतर रस्त्स्याची गरज ही आता जास्तच वाढली आहे.
अर्धे शहर महामार्गाच्या पुढे
पाच लाख लोकसंख्येच्या जळगाव शहराची अर्धी लोकसंख्या दररोज महामार्ग ओलांडत असते.
कारण महामार्गालगत अनेक शाळा, कॉलेजेस, शिक्षणसंस्था, वाणिज्यक आस्थापना, एमआयडीसी आहे. काही विशिष्ट वेळात तर महामार्ग ओलांडणाºया लोकांची संख्या ही प्रचंड असते.
त्यामुळे अजिंठा चौफुली, इच्छादेवी चौफुली, आकाशवाणी चौफुली, प्रभात चौफुली पुढे शिवकॉलनी, खोटे नगर या भागात वाहनांची नेहमी कोंडी होत असते.
यातूनच अपघात होतात. गेल्या काही दिवसात तर या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याने समांतर रस्त्यांची मागणी वाढली आहे.
मनपा देणार पालकमंत्र्यांना पत्र
शहरातील उड्डाण पुल व समांतर रस्त्यांसाठी मदत मिळावी म्हणून मनपाचे शिष्टमंडळ सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना या कामांसाठी मदत मिळावी म्हणून साकडे घालणार आहे. महापौर नितीन लढ्ढा यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ पालकमंत्र्यांची भेट घेणार आहे.