क्रिकेट खेळण्यास विरोध केल्याने दुकानांवर दगडफेक

By admin | Published: June 19, 2017 11:29 AM2017-06-19T11:29:58+5:302017-06-19T11:29:58+5:30

तीन दुकानांच्या काचा फुटल्या : बळीराम पेठेतील रात्रीची घटना; पोलिसांकडून दोघांवर कारवाई

Stacked stones at the shops protested against playing cricket | क्रिकेट खेळण्यास विरोध केल्याने दुकानांवर दगडफेक

क्रिकेट खेळण्यास विरोध केल्याने दुकानांवर दगडफेक

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.19 : क्रिकेट खेळण्यास विरोध केल्याने मद्यपी तरुणांनी बळीराम पेठेतील साजनदास व्यापारी संकुलातील तीन दुकानांवर दगडफेक केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री साडे बारा वाजता घडली. यात सनी ट्रेडर्स, बबल गारमेंट व ज्योती फुट वेअर या तीन दुकानांच्या काचा फुटल्या असून प्रत्येकी 15 ते 20 हजाराचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दोन जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
बळीराम पेठेत भाजी मार्केटला लागून साजनदास व्यापारी संकुल आहे. त्यात विजयकुमार कौरानी यांच्या मालकीचे सनी ट्रेडर्स, शामलाल तलरेजा यांच्या मालकीचे बबल गारमेंट व अजय मेघानी यांच्या मालकीचे ज्योती फूट वेअर या नावाने दुकान आहे. या व्यापारी संकुलाच्या समोर रात्रीच्या वेळी काही तरुण क्रिकेट खेळतात. शनिवारी रात्री माल घेवून ट्रक आल्याने या दुकानदारांनी क्रिकेट खेळणा:या तरुणांना विरोध केला. त्याचा राग आल्याने दोन मद्यपींनी दुकानावर दगडफेक केली. त्यात तिन्ही दुकानांच्या काचा फुटल्या. यावेळी मद्यपींनी धिंगाणा घातल्याने वातावरण चिघळले होते.

Web Title: Stacked stones at the shops protested against playing cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.