चोसाका प्रशासनाला रात्री दीड वाजता कामगारांचा करावा लागला पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 06:41 PM2017-11-11T18:41:47+5:302017-11-11T18:47:15+5:30
चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी शुक्रवारी रात्री मोलॅसीसचे टँकर अडविल्याने प्रशासनाने धावपळ करीत आंदोलन करणाºया कामगारांना पगार वाटप केले.
लोकमत आॅनलाईन
चोपडा, दि.११ : कामगारांचे थकलेले पगार देण्याच्या मागणीसाठी चहार्डी ता. चोपडा येथील साखर कारखान्यातील कामगारांनी १० रोजी मोलॅसिस भरलेले ३ टँकर्स अडविले होते. तसेच कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने अखेर प्रशासनाने रात्री दीड वाजता धावपळ करून कामगारांचे पगार वाटप केले आणि हा तिढा सोडविला.
सुमारे ७० ते ८० कामगारांनी शुक्रवारी सायंकाळी कारखान्यातून मोलॅसीस घेऊन जाणारे तीन टँकर अचानक अडविले, तसेच प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडला. त्यामुळे टँकर्स अडकून पडले. दरम्यान, चोसाकाचा आगामी गळीत हंगाम सुरू करण्यावर याचा विपरीत परिणाम होईल म्हणून संचालक मंडळ व प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन रात्री तब्बल १.३० वाजता मोलॅसिसचे टँकर अडवणाºया कामगारांचा पगार केला. रात्री दीड ते अडीच वाजेच्या सुमारास आंदोलनस्थळी हजर असलेल्या ४० ते ४५ कामगारांचे पगार वाटप करण्यात आले. पगारापोटी जवळपास पाच लाख रुपये वाटावे लागले. यासाठी चोसाका संचालक निलेश पाटील व प्रभारी कार्यकारी संचालक आधार चिंतामण पाटील आणि अकाउंटंट अनिल सीताराम पाटील यांनी रातोरात कामगारांचे पगार वाटप करण्यासाठी धावपळ केली.
मात्र जे कामगार चोसाकाच्या गेटजवळ ठिय्या मारून बसले होते त्यांनाच पगार देण्यात आला. त्यामुळे जे घरी निघून गेले त्या कर्मचाº्यांना पगार मिळाला नसल्याने ते ११ रोजी दिवसभर चोसाकाच्या कार्यालयात पगार मिळेल या आशेने थांबून होते.