दुसरा डोस घेण्यासाठी कर्मचारी येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:28 AM2021-03-13T04:28:43+5:302021-03-13T04:28:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पहिला डोस घेतलेल्या १३,४११ कर्मचाऱ्यांना गुरुवारी २८ दिवसांचा कालावधी उलटला. मात्र, यापैकी आतापर्यंत निम्म्याच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पहिला डोस घेतलेल्या १३,४११ कर्मचाऱ्यांना गुरुवारी २८ दिवसांचा कालावधी उलटला. मात्र, यापैकी आतापर्यंत निम्म्याच कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. दुसरा डोस घ्यायला कर्मचारी वेळेवर येत नसल्याचे चित्र आहे.
पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यायचा आहे. त्यानंतर १५ दिवसांनी शरीरात ॲन्टीबॉडी तयार होतात. कोरोना लस घेतल्यानंतर कोरोनाचे गांभीर्य कमी होते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लसीकरण लवकर आटोपण्यासाठी केंद्रे वाढविण्यात येत असून लोकांनी न घाबरता लस घ्यावी, दुसरा डोसही पूर्ण करावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी केले आहे. अद्याप ६,२८८ कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस बाकी असून रोज ही संख्या वाढत आहे. नियमित सरासरी ६५० कर्मचारी दुसरा डोस घेत आहेत.