कर्मचारी संघटनांचा संप : जळगाव जिल्ह्यात शाळांना सुट्टी, महसूल, पंचायत समितीचे कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:55 PM2020-01-08T12:55:02+5:302020-01-08T12:55:28+5:30

मोबाईल दुकाने देखील बंद

Staff unions: Vacation, Revenue, Panchayat Samiti works on schools in Jalgaon district | कर्मचारी संघटनांचा संप : जळगाव जिल्ह्यात शाळांना सुट्टी, महसूल, पंचायत समितीचे कामे ठप्प

कर्मचारी संघटनांचा संप : जळगाव जिल्ह्यात शाळांना सुट्टी, महसूल, पंचायत समितीचे कामे ठप्प

Next

जळगाव : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ संघटीत, असंघटीत, कंत्राटी, रोजंदारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध संघटना सहभागी झाल्या असून संपामुळे बँकींग व्यवहार ठप्प झाले आहे.
मोबाईल दुकाने देखील बंद
अमळनेर तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना, महसूल कर्मचारी संघटना, ग्रामसेवक संघटना, विस्तार अधिकारी संघटना तसेच मोबाईल विक्रेते दुकानदार आपापल्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी बंदमध्ये सहभागी होऊन संपावर उतरले आहेत.
महसूल कर्मचारी संघटनेने तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन देऊन संपावर उतरले आहेत. यावेळी नायब तहसीलदार कमलाकर जोशी, राजेंद्र चौधरी, उपविभागीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश सोनवणे, तहसील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भूषण पाटील, संदीप पाटील, कपिल पाटील, गंगाधर सोनवणे, नितीन ढोकने, सुनील गरूडकर, सुषमा पाटील आदी कर्मचारी हजर होते.
मुख्याध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष एम. ए. पाटील, तुषार पाटील, प्रकाश पाटील, माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, टी. डी. एफ संघटनेचे सुशील भदाणे, शिक्षक भारतीचे आर. ज.े पाटील, जुनी पेन्शन योजना संघटनेचे प्रभूदास पाटील, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कैलास पाटील, सचिव सुनील चौक, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संजय भाईदास पाटील, सचिव संजीव सैंदाने, विस्तार अधिकारी एल.डी. चिंचोरे, अनिल राणे आदींनी आपापल्या विभागाचे कर्मचारी संपावर असल्याचे सांगितले. तर देशभर मोबाईल दुकानदारांचा देखील बंद असल्याचे प्रितेश जैन, अतुल महाजन यांनी सांगितले.
चाळीसगाव परिसरातील माध्यमिक शाळांचे कामकाज ठप्प
चाळीसगाव तालुक्यात बुधवारी विविध संघटनांनी पुकारलेल्या संपाला चाळीसगाव परिसरात सकाळी ११ वाजेपर्यंत संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळ विभागात भरणा-या माध्यमिक शाळांमधील कामकाज संपामुळे ठप्प झाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना अघोषित सुट्टी दिल्याने शाळा काही तासात ओस पडल्या. बहुतांशी शाळांमधील शिक्षकांनी संपात सहभाग घेतला. शहरातील खासगी प्राथ. शाळांचे कामकाज सुरळीत सुरु होते. खासगी प्राथ. शाळांमधील शिक्षकांनी संपाला बाहेरुन पाठिंबा दिला असून काळ्या फिती लावून संपात सहभाग नोंदवला आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर मात्र संपाचा परिणाम दिसून आला.
जि.प.व्यवस्थापनाच्या तालुक्यात १०९ प्राथ. शाळा असून या शाळांमधील शिक्षकांनी संपात सहभाग घेतलेला नाही. जि.प.च्या सर्व शाळा ११ ते पाच यावेळात भरतात. संघटनांनी संपात सहभाग घेतल्याचे लेखी पत्र दिले नसून ग्रामीण भागातील जि.प.शाळांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु राहिल. तालुक्यात ७२ माध्य. शाळा असून यातील बहुतांशी शाळांमधील शिक्षक संपात सहभागी झाले असल्याची माहिती प्र.गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी दिली.
महसूल, पं.स.कर्मचारीही संपात सहभागी
पंचायत समिती व महसुल विभागातील कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. सकाळी ११ वाजता 'लोकमत' प्रतिनिधीने कार्यालयांमध्ये फेरफटका मारला असता कर्मचा-यांची कमी उपस्थिती दिसून आली. संपात किती कर्मचारी सहभागी झाले याचा आढावा घेण्यात आहे. अशी माहिती नायब तहासिलदार विशाल सोनवणे व गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी दिली. दरम्यान शिक्षक संघटनांसह तलाठी संघटनेनेही संपाला प्रतिसाद दिला आहे.
जिल्ह्यातील ग्रामसेवकांचा संपात शंभर टक्के सहभाग
जिल्ह्यातील ९७४ ग्रामसेवकांनी संपात शंभर टक्के सहभाग नोंदवला आहे. यामुळे ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. आम्ही पूर्णपणे संपात सहभागी झालो आहोत. अशी माहिती ग्रामसेवक संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम यांनी दिली.
मुक्ताईनगर तालुक्यात शिक्षक संपात सहभागी झाले आहेत. रावेरला पं.स. कृषी विभाग, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना, महसूल कर्मचारी संघटना संपावर असून उर्वरीत पं.स. कार्यालय, जि. प. सिंचन व बांधकाम, सार्वजनिक बांधकाम, तालुका कृषी कार्यालय सुरळीत आहेत.
बोदवड येथे अंगणवाडी सेविका तसेच प्राथमिक शाळा शिक्षक, तसेच बँक बंद आहेत. पारोळा तालुक्यात शाळा, तहसील कार्यालय कर्मचारी पंचायत समिती कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

Web Title: Staff unions: Vacation, Revenue, Panchayat Samiti works on schools in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव