जळगावात नाट्यगृहाच्या उद्देशाला जादा शुल्कामुळे हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:09 PM2018-11-21T12:09:54+5:302018-11-21T12:10:40+5:30

छत्रपती संभाजे राजे नाट्यगृहाचे दर अन्य जिल्ह्यातील नाट्यगृहांच्या तुलनेत अधिक

Staggered due to excess fees for the purpose of the playground in Jalgaon | जळगावात नाट्यगृहाच्या उद्देशाला जादा शुल्कामुळे हरताळ

जळगावात नाट्यगृहाच्या उद्देशाला जादा शुल्कामुळे हरताळ

Next
ठळक मुद्देगैरसोय भ्रष्टाचार उघड करा

जळगाव : अनेक वर्षांच्या मागणीनंतर शहरात शासनाकडून उभारण्यात आलेल्या बंदिस्त नाट्यगृहाचे शुल्क मात्र अन्य जिल्ह्णातील नाट्यगृहांच्या तुलनेत अवास्तव असल्याने जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्राची नाट्यगृहाअभावी असलेली परवड कायम आहे. यामुळे या नाट्यगृह उभारणीच्या उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.
शहरात बालगंधर्व खुले नाट्यगृह होते. मात्र तेथे सांस्कृतिक कार्यक्रम उन्हाळ्यात व पावसाळ्यातही घेणेअडचणीचे ठरत होते. त्यामुळे जळगावकरांना नाट्यगृहाअभावी चांगले सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यस्पर्धांना यापासून वंचित रहावे लागत होते. अखेर जळगाव शहरातही छत्रपती संभाजी राजे बंदिस्त नाट्यगृह उभारण्यात आले.
भ्रष्टाचार उघड करा
एसडी-सीडच्याशिष्यवृत्ती वितरण सोहळ्याप्रसंगी भाषणात विजय दर्डा म्हणाले की, सकाळी जळगावात आगमन झाले, तेव्हा एक फोन आला. तुम्ही ज्या नाट्यगृहात कार्यक्रमाला जाणार आहात, त्यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगितले. या नाट्यगृहाबाबत माहिती घेतली असता या कामासाठी ३५ कोटी खर्च झाल्याचे सांगण्यात आले. आसन क्षमता मात्र १२०० आहे. आम्ही नागपूरला सुरेश भट आॅडीटोरियम केले. त्याची आसन क्षमता २००० आहे. ते काम केवळ ५० ते ५५ कोटींमध्ये झाले. तसेच अशा कार्यक्रमांसाठी अत्यल्प शुल्क आकारले जातात. त्यामुळेयाची चौकशी करून कुठे पाणी मुरले आहे? ते शोधून काढले पाहिजे. नाट्यगृहाच्या देखभालीसाठी भाडे लागणारच. मात्र आमच्याकडे मुख्यमंत्र्यांनी तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यस्थी केली. त्यांच्याकडून भाडे कमी करून आणल्याचे सांगितले. नागपूरच्या नाट्यगृहात एसीची तसेच पिण्याच्या पाण्याचीही सोय आहे. इथेमात्र येतानाच मला सांगण्यात आले की नाट्यगृहात जाल तर कृपया शौचालयाचा वापर करू नका. हे ऐकून आश्चर्यच वाटले.
तुलनात्मक स्थिती
जळगावात ७० हजार भाडे
मालकी- राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत या छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिराची उभारणी केली आहे. महिनाभरापूर्वीच त्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
आसन क्षमता- १२०० आसन क्षमता असलेल्या या वातानुकुलीत नाट्यगृहासाठी सुमारे ३५ कोटी रूपये खर्च झाला आहे.
भाडे- कार्यक्रमांनुसार किमान १० हजारांपासून ते ७० हजारांपर्यंत भाडे आकारणी केली जाते. मात्र हे नाट्यगृह शासन अथवा मनपाकडे हस्तांतरीतच झालेले नाही.
नंदुरबारात १५ हजार भाडे
मालकी- नंदुरबार नगरपालिकेने शहरात छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर उभारले आहे. वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेंतर्गत २००५ साली याचे काम मंजूर झाले. ते २००९-१० मध्ये पूर्ण झाले.
आसन क्षमता- ९०८ आसन क्षमतेच्या या सभागृहासोबतच ‘डोम’ पण बांधण्यात आला आहे. या कामावर एकूण ५ कोटी २१ लाख रूपये खर्च आला.
भाडे- लग्नसमारंभासाठी या नाट्यगृहाचे डोमसह एका दिवसाचे भाडे ५० हजार ७५५ रूपये आहे. तर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी १५ हजार ५५५ रूपये भाडे आकारण्यात येते. ए.सी.चा वापर केल्यास लाईटबिल स्वतंत्रपणे आकारले जाते.
नागपूरात किमान ५ हजार भाडे
मालकी- शहरात सीव्हील लाईन्स भागातच नाट्यगृह होते. त्यामुळे रेशिमबाग या मध्यवर्ती ठिकाणी नवीन कविवर्य सुरेश भट नाट्यगृह बांधण्यासाठी २०१३ मध्ये मंजुरी मिळाली. शासनाने ७० टक्के तर मनपाने ३० टक्के निधी खर्चून सुमारे ८० कोटी रूपये खर्चाचे
आसन क्षमता- २ हजार आसन क्षमतेचे हे वातानुकुलीत नाट्यगृह उभे केले. अत्यंत अत्याधुनिक असे हे नाट्यगृह आहे. त्यात गरजेनुसार आसनक्षमता कमी करण्याची देखील सोय आहे. त्यामुळे लहान कार्यक्रमांसाठी १५०० आसनक्षमता देखील करता येते.
भाडे- लहान कार्यक्रमांसाठी ५ हजार रूपये भाडे आकारले जाते. तर व्यावसायिक कार्यक्रमांसाठी सर्वाधिक भाडे ४० हजार रूपये आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मध्यस्थी करायला लावून हे भाडे परवडेल असे ठेवले आहे. सौर उर्जेची सोय केलेली असल्याने विजबिलाचा खर्च नगण्य आहे.
नागपूरमध्ये मोठे नाट्यगृह असून अत्यल्प दरात उपलब्ध
जळगावात बंदिस्तनाट्यगृह उभारण्यात आले मात्र अधिक भाडे असल्याने सांस्कृतिक क्षेत्राची समस्या कायमच राहिली आहे. एसडी-सीड अर्थात सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजनेंतर्गत गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहूणे म्हणून लोकमत वृत्तपत्र समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आले होते. त्यांनी नागपूरमध्ये या पेक्षा मोठे नाट्यगृह अत्यल्प दरात उपलब्ध करून देतो, असे सांगितले. त्यामुळे नागपूरमध्ये जर नाट्यगृहाचे भाडे कमी करता येऊ शकत असेल. सौर उर्जेचा वापर करून वीज बिलाचा पर्यायाने देखभालीचा खर्च कमी केला जात असेल, तर ते जळगावात का शक्य होऊ शकत नाही? असा सवाल नाट्य क्षेत्रातील मंडळींकडून केला जात आहे.

Web Title: Staggered due to excess fees for the purpose of the playground in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव