जळगाव जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:18 AM2021-03-01T04:18:39+5:302021-03-01T04:18:39+5:30

शेळगाव बॅरेज शेळगाव बंधाऱ्यामुळे ४.५ टीएमसी इतक्या पाण्याचा साठा होणार आहे. यामुळे यावल तालुक्यातील ९,१२८ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार ...

Stalled projects in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प

जळगाव जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प

Next

शेळगाव बॅरेज

शेळगाव बंधाऱ्यामुळे ४.५ टीएमसी इतक्या पाण्याचा साठा होणार आहे. यामुळे यावल तालुक्यातील ९,१२८ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून हजारो शेतकऱ्यांना ‍यांचा लाभ होणार आहे. १९९७-९८ मध्ये या प्रकल्पाचे मूल्य १९८.०५ कोटी इतके होते. २०१६ साली याला ९६८.९७ कोटी रुपयांची द्वितीय सुधारित मान्यता प्रस्तावित करण्यात आली होती. १३ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीत यालाच राज्य शासनाची मान्यता मिळाली असून याचमुळे या प्रकल्पाला वाढीव निधी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

प्रकल्पाचे ठिकाण: शेळगाव बॅरेज हा मध्यम प्रकल्प मौजे शेळगाव, ता. जळगाव या गावापासून दीड किमी अंतरावर तापी नदीवर होत आहे.

कामाला सुरुवात: ५ डिसेंबर १९९९ पासून या प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली. त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.

प्रकल्पाचा एकूण खर्च: ९६८.९७ कोटींची सुप्रमा आहे. त्यावर आतापर्यंत सुमारे ६५० कोटींचा निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. तर उर्वरित कामासाठी आणखी सुमारे ३१८ कोटींच्या आसपास निधीची आवश्यकता आहे.

———————————

निम्न तापी प्रकल्प (पाडळसरे)

निम्न तापी प्रकल्पाची टप्पा १ ची प्रकल्पीय सिंचन क्षमता २३,३२८ हे. असून प्रकल्पीय पाणीसाठा २६२.५८ दलघमी आहे. प्रकल्पाचे उजव्या तीरावरील माती धरणाचे काम पूर्ण झाले असून डाव्या तीरावरील माती धरणाचे काम ७० टक्के झाले आहे. तर धरणाचे बांधकाम सांडवा मुर्धा पातळी १३९.२४ मी. पर्यंत झाले आहे. प्रकल्पाचे स्थापत्य कामे, वक्राकार दरवाजे, उर्वरित भूसंपादन व पुनर्वसन कामे वेळेत (जून २०२६) पूर्ण होण्यासाठी दरवर्षी ३५० ते ४०० कोटींची गरज आहे. शासनाच्या ९ सप्टेंबर २०१९ च्या पत्रान्वे पीएमकेएसवाय व बीजेएसवाय या दोन्ही योजनेत समाविष्ट प्रकल्प वगळून उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रु. १५ हजार कोटीचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मान्यता प्राप्त झाली असून या प्रकल्पांमध्ये निम्न तापी प्रकल्पाचा समावेश आहे.

प्रकल्पाचे ठिकाण : अमळनेर तालुक्यात मौजे पाडळसे गावाजवळ तापी नदीवर.

कामाला सुरुवात: एप्रिल १९९९ पासून या प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली असून प्रकल्पाचे ४३ टक्के काम पूर्ण झाले आहे.

प्रकल्पाचा एकूण खर्च: ११२७.७४ कोटींची सुप्रमा प्राप्त असून २,७५१ कोटीची चतुर्थ सुप्रमा मान्यतेची कार्यवाही सुरू आहे. प्रकल्पावर आतापर्यंत ५४१.७३ कोटी रुपये खर्च झाला असून अजून २२०९.३२ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.

Web Title: Stalled projects in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.