भाजपच्या मावळत्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यकाळाची सुरुवात व शेवट मारहाणीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:09 PM2020-01-13T12:09:14+5:302020-01-13T12:09:26+5:30

योगायोग : डॉ. संजीव पाटील यांच्या कार्यकाळात विधानसभा निवडणुकीसह जि.प. अध्यक्ष निवड

 The start and end of the post of BJP's district president started with a beating | भाजपच्या मावळत्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यकाळाची सुरुवात व शेवट मारहाणीने

भाजपच्या मावळत्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यकाळाची सुरुवात व शेवट मारहाणीने

Next

जळगाव : भाजपचे मावळते जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांच्या कार्यकाळाची सुरुवात व शेवट पक्षांतर्गत मारहाणीच्या घटनेने झाल्याचा योगायोग पक्षाने अनुभवला. अमळनेर येथील हाणामारीच्या घटनेनंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी राजीनामा दिला व ही सूत्रे डॉ. पाटील यांच्याकडे आली. त्यानंतर नवीन जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीप्रसंगीही जळगावात पुन्हा मारहाण झाली.
जळगाव जिल्हा हा सुरुवातीपासूनच भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे सुरुवातीपासून येथील भाजप जिल्हाध्यक्षांच्या कामाची सर्वत्र चुणूक असल्याचे बोलले जाते. यात विद्यार्थी परिषदेच्या कार्यपद्धतीतून पुढे आलेले उदय वाघ यांनी अनेक वर्षे हे पद संभाळले व जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभेत जिल्ह्याचे वर्चस्व टिकवून ठेवण्यास हातभार लावला. मात्र २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी बदलण्यावरून उफाळून आलेल्या वादातून अमळनेर येथे माजी आमदार बी.एस. पाटील यांना पक्षाच्या व्यासपीठावरच वाघ व त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या घटनेनंतर या पदाची सूत्रे डॉ. संजीव पाटील यांच्याकडे आली. या दरम्यान संघटनात्मक निवडणुकांसाठी सक्रीय कार्यकर्ते नोंद, बुथ प्रमुख, मंडळ अध्यक्ष निवड या प्रक्रिया त्यांनी पूर्ण केल्या. मात्र शेवटी जिल्हाध्यक्ष निवडीप्रसंगीच पुन्हा मारहाणीचा प्रकार घडला.
भुसावळ शहर तालुकाध्यक्ष निवडीवरून व्यासपीठावरच पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे यांना भुसावळ येथीलच कार्यकर्त्यांनी मारहाण करीत शाई फेक केली. मिळालेल्या कार्यकाळात डॉ. पाटील यांनी वेगवेगळ््या जबाबदाऱ्या पार पाडल्या. मात्र या मारहाणीच्या घटनेने त्यांचा कार्यकाळ संपला.

भावूक होऊन सोपविली वाहनाची चावी
जिल्हाध्यक्ष निवडी प्रसंगी अगोदर डॉ. पाटील यांनीही या पदासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले. मात्र नंतर त्यांनी माघार घेतली. शेवटी हरिभाऊ जावळे यांची निवड जाहीर होताच डॉ. पाटील यांनी भावूक होत जिल्हाध्यक्षांच्या वाहनाची चावी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली.

नेवे मारहाण प्रकरणी शिस्तभंगाचा अहवाल सादर
रावेर/ भुसावळ : जळगाव येथील भाजप जिल्हाध्यक्ष निवडीच्या विशेष सभेत जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे यांच्या अंगावर शाई टाकून लाथाबुक्क्यांनी मारहाण करतांना फुटेजमध्ये आढळून येणाºया दोषी कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई करण्यासंबधी प्रदेश कार्यालयाकडे शिस्तभंगाचा अहवाल सादर झाला आहे. येत्या आठवडाभरात संबंधित दोषींविरुद्ध थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

Web Title:  The start and end of the post of BJP's district president started with a beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.