कृषी उत्पन्न बाजार समितीत अँटी जन टेस्ट कॅम्प सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:17 AM2021-04-20T04:17:25+5:302021-04-20T04:17:25+5:30
योगेश खडके यांना पीएच.डी. प्रदान (फोटो मेल केला आहे ) जळगाव - शहरातील शिवकॉलनीतील रहिवासी योगेश पद्माकर खडके यांना ...
योगेश खडके यांना
पीएच.डी. प्रदान
(फोटो मेल केला आहे )
जळगाव - शहरातील शिवकॉलनीतील रहिवासी योगेश पद्माकर खडके यांना हिमालयन विद्यापीठाने एन्व्हारर्मेंटल मॅनेजमेंट या क्षेत्रात डॉक्टरेट प्रदान केली. योगेश खडके यांनी ‘इव्हॉल्यूशन ऑफ सिग्निफिकंस ऑफ वॉटर क्वालिटी इंडेक्स अॅण्ड एनालिसीस ऑफ वॉटर कॉनटामिनेशन युझिंग ग्लोबल हिट मॅप’ या विषयात संशोधन केले. त्यांना प्रा.डॉ.प्रकाश करमडमकर (सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे) आणि डॉ. प्रकाश दिवाकरन (संचालक, ग्लोबल रिसर्च कॉन्फरन्स फोरम), डॉ. पोवर (लंडन) यांचे सहकार्य लाभले. योगेश हे मुंबई येथील वॉनसन ग्रुपमध्ये एनर्जी विभागात व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. ते जळगाव येथील डॉ. पद्माकर नामदेव खडके यांचे पुत्र आहेत.
नूतन मराठा महाविद्यालयात अँटिजन टेस्ट कॅम्प
जळगाव - महापौर - उपमहापौर यांच्या आदेशाने सोमवारपासून नूतन मराठा महाविद्यालय येथे कोरोना अँटिजन टेस्ट कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी या ठिकाणी एकूण ६० जणांची चाचणी करण्यात आली. कॅम्प चे उद्घाटन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरीष ठुसे आणि मनपा कर्मचारी उपस्थित होते.
गिरणेला पूर असतानाही उपसा सुरूच
जळगाव - गेल्या तीन दिवसांपासून गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तन मुळे भर उन्हाळ्यात गिरणा नदीला पूर आला आहे. मात्र अशा पुर मध्ये देखील गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा सुरू आहे. मात्र याबाबत महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई आतापर्यंत करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.