यावल येथे बालाजी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळयास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 05:01 PM2019-01-01T17:01:29+5:302019-01-01T17:04:02+5:30

यावल येथे पूर्णराम नारायण (बालाजी) व श्री गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सोमवारी शोभायात्रेने सुरवात झाली. २ रोजी सकाळी १० वाजता येथे पूर्णार्थ नगरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे.

Start of celebrating Pranpritta in Balaji temple at Yaval | यावल येथे बालाजी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळयास प्रारंभ

यावल येथे बालाजी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळयास प्रारंभ

Next
ठळक मुद्देदशाविधी स्नान, स्थापित देवता हवन, प्राणप्रतिष्ठा पूर्णाहुतीशोभायात्रेने वेधले लक्षशोभायात्रेच्या मार्गावर सजल्या रांगोळ्या

यावल, जि.जळगाव : यावल येथे पूर्णराम नारायण (बालाजी) व श्री गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सोमवारी शोभायात्रेने सुरवात झाली. २ रोजी सकाळी १० वाजता येथे पूर्णार्थ नगरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे.
येथे सायंकाळी चारला पंचवटी भागातून अ‍ॅड़ राजेश गडे यांच्या निवासस्थानापासून शोभायात्रेस सुरूवात झाली. शोभायात्रेत कलशधारी महिला, महिलांचे भजनी मंडळ सामील होते. सजविलेल्या ट्रॅक्टरवर पूर्णराम नारायण (बालाजी ), डॉ.रामचंद्र पानेरकर महाराज, श्रीगणेश यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या.
शोभायात्रा मिरवणूक पंचवटी, चावडी, जळगाव जनता बँक, गवत बाजार, वाचनालय, लक्ष्मीनारायण मंदिर, आयडीबीआय बँक, मेनरोड, महाजन गल्ली, सुंदर नगरवरून पूर्णार्थनगर अशी निघाली होती. मिरवणुकीच्या मार्गावर महिलांनी अंगणात सडे घालून रांगोळ्या काढल्या होत्या.
बुधवारी सकाळी दहाला दशाविधी स्नान, स्थापित देवतास हवन दुपारी दोनला प्राणप्रतिष्ठा पूर्णाहुती व आरती होईल. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे पूर्णराम नारायण (बालाजी) मंदिर उत्सव समितीतर्फे कळविण्यात आले आहे.

 

Web Title: Start of celebrating Pranpritta in Balaji temple at Yaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.