भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथे ग्रामस्थांचे सिंचन प्रकल्पासाठी साखळी उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 04:23 PM2019-02-19T16:23:40+5:302019-02-19T16:25:26+5:30
भडगाव तालुक्यात कमी पाऊसमान म्हणून आधीच अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या जुवार्डी भागातील पाझरतलाव क्रमांक तीन व नदीजोडतंर्गत आडळसे-जुवार्डी-पथराड पोहोच कालव्याचे काम वर्षानुुवर्षे अर्धवटच असून, यासाठी मंगळवारी शिवजयंतीपासून जुवार्डी येथील ग्रामस्थांनी गावातील शहीद स्मारकाजवळ साखळी उपोषण सुरू केले आहे.
खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : तालुक्यात कमी पाऊसमान म्हणून आधीच अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या जुवार्डी भागातील पाझरतलाव क्रमांक तीन व नदीजोडतंर्गत आडळसे-जुवार्डी-पथराड पोहोच कालव्याचे काम वर्षानुुवर्षे अर्धवटच असून, यासाठी मंगळवारी शिवजयंतीपासून जुवार्डी येथील ग्रामस्थांनी गावातील शहीद स्मारकाजवळ साखळी उपोषण सुरू केले आहे.
सकाळी हनुमान मंदिरापासून फेरी काढत शहीद स्मारकास अभिवादन व शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन करून गावातील संपूर्ण ग्रामस्थ उपोषणास बसले. यासंदर्भात ग्रामस्थांनी याआधीच आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांकडे दिले आहे.
दरम्यान, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी यांनी जि.प. मृद व जलसंधारण विभागाला दि.१५ रोजी एक पत्र देवून जुवार्डी पाझर तलावाच्या पोटी वनविभागाला द्यावयास लागणाºया ८१ लाख ३८ हजार एन.पी.व्ही. निधीचा प्रस्ताव आवश्यक त्या त्रुटीची पूर्तता करुन सादर करावयास सांगितले आहे. या आशयाचे पत्र ग्रामस्थांनी जिल्हाधिकाºयांना उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ग्रामपंचायतीला प्राप्त झाले असले तरी ठोस आश्वासनाशिवाय उपोषण सुरुच ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे.
काय आहे जुवार्डीकरांची मागणी?
जुवार्डी गावाच्या वरच्या भागात वनविभागाच्या हद्दीत १९८०मध्ये पाझर तलावाचे काम रोहयोंतर्गत सुरू झाले. माती भरावाचे नव्वद टक्के काम दोन-चार वर्षात पूर्ण झाले. फक्त नाल्याची धार बंद करण्याचे १० टक्के इतके काम बाकी असताना वनविभागाने हरकत घेतल्याने ३० वर्षांपासून काम बंद पडले. त्यानंतर पाठपुरावा झाला. वनविभागाने हिरवा कंदील दाखविला. पण वनविभागाला लागणाºया एन.पी.व्ही. रकमेअभावी आता मागील काही वर्षांपासून काम रखडले आहे. याचबरोबर गिरणा धरणातून निघालेल्या वसंतदादा कालव्यापासून आडळसे-जुवार्डी ते पथराड धरण असा पोहोच कालव्याचे काम नदीजोड योजनेतून सुरू झाले, मात्र निधीअभावी तेदेखील काम बंद पडले. तिसरी मागणी बहाळ येथील जामदा कालव्यापासून ते जुवार्डी असा झालेला जुना सर्व्हे पूर्ण करून त्याचा लाभ मिळावा ही आहे. ही तीनही कामे पूर्ण झाल्यास तालुक्यात सर्वाधिक मोठे शिवार असलेले (जवळजवळ १००० हेक्टर) जुवार्डी सुजलाम-सुफलाम होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.