जळगाव जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची लगबग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:30 PM2018-10-05T12:30:30+5:302018-10-05T12:31:24+5:30

१० आॅक्टोबरपासून उत्सव

Start of Navratri festival in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची लगबग सुरू

जळगाव जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची लगबग सुरू

Next
ठळक मुद्देउपासना आदीशक्तीची१८ आॅक्टोबरला विजयादशमी

नशिराबाद, जि. जळगाव : नवरात्र उत्सव म्हणजे आदीशक्ती, आदीमाया अंबामातेच्या उपासनेचा पर्वकाल असतो. यंदा १० आॅक्टोबरपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून १८ आॅक्टोबरला विजयादशमी (दसरा) आहे. तिथींचा क्षय व वृद्धी झाल्याने यंदा नवव्या दिवशीच दसरा आहे.
अवघ्या आठ दिवसांवरच नवरात्रोत्सव येऊन ठेपल्याने घरोघरी नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. देवींच्या मंदिरात साफसफाई, रंगरंगोटी आदी कामांना वेग आला आहे.
शाश्वत चैतन्यांचा व उर्जेचा झरा कायम राहत ठेवणारा उत्सव नवरात्र. या कालखंडात नवदुर्गेची, आदिमाया, आदीशक्तीची उपासना करीत नवरात्र उत्सव साजरे करण्यात येत असते. यंदा १० आॅक्टोबर रोजी बुधवारी सकाळी ७ वाजून २६ मिनिटांपर्यंत प्रतिपदा आहे. त्यादिवशी घटस्थापना करावी. कुलपरंपरेनुसार देवीची प्रतिष्ठापना करीत घटस्थापन करावे.
यंदा प्रतिपदा तिथीचा क्षय झाला असून षष्ठी तिथीची वृद्धी झालेली आहे. त्यामुळे १३ रोजी ललिता पंचमी व्रत व पंचरात्रोत्सवारंभ आहे.
१४ रोजी सरस्वती आवाहन दुपारी १ वाजून १४ मिनिटानंतर असून १५ रोजी सरस्वती पूजन, १६ रोजी त्रिरात्रोत्सारंभ महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. १६ रोजी मंगळवारी सकाळी १० वाजून १७ मिनिटानंतर अष्टमी असून १७ रोजी बुधवारी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत अष्टमी आहे. यादिवशी दुर्गाअष्टमी, महाअष्टमी उपवास, सरस्वती बलिदान आहे. १८ रोजी महानवमी, देवीला बलिदान व विजयादशमी (दसरा) आहे.
१८ आक्टोबरला गुरुवारी नवमी तिथी समाप्ती दुपारी ३ वाजून २९ मिनिटाला होत आहे. त्यानंतर अपराण्हकाळात थोडावेळ दशमी असून श्रवण नक्षत्रसुद्धा असल्याने श्रवणयोग होत आहे. त्यामुळे नवमीच्या दिवशीच विजयादशमी दिलेली आहे असे पंचागात नमूद आहे.
नवरात्रोत्सवात घटस्थापना, अखंड दीप, नामजप, स्त्रोत्रपठण, दुर्गासप्तशतीपाठ वाचन, सुक्त पठण, उपवास, कुमारिकापूजन, होम-हवन आदी उपासनेला अनन्य महत्त्व आहे. या काळात अनवाणी चालणे, नक्तप्रत भोजन भाविक करीत देवीला आळवणी करतात. प्रसन्नतेची प्रार्थना व्यक्त केली जाते.

Web Title: Start of Navratri festival in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.