जळगाव येथे मौखीक आरोग्य तपासणी व कुष्ठरोग शोध मोहिमेस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 01:33 PM2018-10-03T13:33:10+5:302018-10-03T13:34:39+5:30
जनजागृती रॅलीने वेधले लक्ष
जळगाव : राष्ट्रीय असंर्गजन्य रोग नियंत्रण अंतर्गत जि.प. आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय अंतर्गत २ आॅक्टोबरपासून मौखीक आरोग्य तपासणी व कुष्ठरोग शोध मोहिमेस सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर कुष्ठरोग शोध मोहिमेच्या जनजागृतीसाठी तालुक्यातील आरोग्य कर्मचारी व परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिंनींची जनजागृती रॅली काढली. यावेळी तंबाखू मुक्तीची कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.
जिल्हा परिषद ते जिल्हा रुग्णालय दरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी हिरवी झेंडी दाखविली. रॅलीपूर्वी कुष्ठरोग बाबत तसेच तंबाखू दुष्परीमाणबाबत माहिती देण्यात आली.
घरोघरी जावून होणार कर्करोगाबाबत तपासणी
मौखीक आरोग्य तपासणी अंतर्गत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आशांमार्फत घरोघरी जावून कर्करोगाबाबत तपासणी करण्यात येणार आहे. घरोघरी भेट देऊन ३० वर्षांवरील व उपकेंद्रात आलेले रुग्ण व नातेवाईक यांची रोज तपासणी करण्यात येणार आहे.
जि.प. अध्यक्षांसह अधिका-यांकडून सफाई अभियान
जिल्हा परिषदमध्ये सर्व विभाग प्रमुख व सर्व कर्मचाºयांनी जिल्हा परिषदेतील कार्यालय व परिसरामध्ये साफसफाई केली. यावेळी जि.प अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनीही स्वच्छता मोहिमेत भाग घेवून स्वत: स्वच्छता मोहिमेस आरोग्य विभागातून प्रारंभ केला. यावेळी अधिकाºयांनीदेखील परिसर स्वच्छ करून अभियानात भाग नोंदविला. यावेळी शिवाजी दिवेकर, अतिरिक्त मुख्या कार्यकारी अधिकारी संजय म्हसकर, राजन पाटील, बी.ए. बोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबिता कमलापूरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डी. एस. पोटोळे, डॉ. प्रमोद पांढरे, डॉ. बी.आर. पाटील, डॉ. संजय चव्हाण, डॉ. गोल्डी चावला, डॉ बाळासाहेब बाबळे, डॉ. अमोल पाटील, अजय चौधरी, विलास बोंडे, विद्या राजपूत व आरोग्य विभागातील कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.