‘बालाजी महाराज की जय च्या जयघोषात रथोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 05:57 PM2017-10-01T17:57:01+5:302017-10-01T18:03:50+5:30

चोपडा येथे श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या वहनोत्सवानिमित्त रविवारी बालाजी महाराजांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. तसेच धरणगाव आणि पारोळा येथेही बालाजींच्या रथोत्सवाला प्रारंभ झाला असून दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती.

'Start of Rathotsav in Balaji Maharaj Ki Jayi Goshosh | ‘बालाजी महाराज की जय च्या जयघोषात रथोत्सवाला प्रारंभ

‘बालाजी महाराज की जय च्या जयघोषात रथोत्सवाला प्रारंभ

Next
ठळक मुद्देदोन दिवस चालणारा खान्देशातील एकमेव रथोत्सव

ऑनलाईन लोकमत

चोपडा, दि. 1 : येथील सुमारे साडे चारशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या वहनोत्सवानिमित्त रविवारी म्हणजेच अश्वीन शुध्द एका्दशीला श्री बालाजी महाराजांच्या रथाचीे मिरवणूक काढण्यात आली. दुपारी बारा वाजता यथोचित पूजा-अर्चा करुन रथोत्सवाला सुरूवात झाली. यावेळी जमलेल्या जनसमुदायाने बालाजी महाराज की जय च्या उद्घोष करीत रथ ओढण्यास प्रारंभ केला. ढोल ताश्यांच्या गजरात रथाने मार्गक्रमण केले. रथ ओढण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, विठ्ठल गुजराथी, आनंदराव देशमुख, तहसीलदार दीपक गिरासे, चंद्रहास गुजराथी, भुपेंद्र गुजराथी,संजय कानडे,पो. नि. किसनराव नजनपाटील, प्रवीण गुजराथी, नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर तसेच शेकडो भाविकांनी गर्दी केली होती . दरम्यान, हा रथोत्सव दोन दिवस चालतो. हा रथ बालाजी संस्थान पासून आशा टॉकीज, र}ावती नदीचा समांतर रोड, पाटील दरवाजा मार्गे सायंकाळी साडेसहा वाजेपयर्ंत गजबजलेल्या शिवाजी चौकात आणला जातो, आणि ह्याच जागेवर रात्रभर थांबविला जातो. नंतर दुस:या दिवशी सकाळी नऊ वाजता रथ पुन्हा ओढून मेन रोड मार्गे रथ घरापयर्ंत नेला जातो. आजच्या रथाच्या मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: 'Start of Rathotsav in Balaji Maharaj Ki Jayi Goshosh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.