जळगाव येथून विमानसेवा सुरू होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व प्रशासकीय परवानगींची पूर्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 03:23 PM2017-10-12T15:23:19+5:302017-10-12T15:26:57+5:30
एमटीडीसीच्या जिल्हा कार्यालयासाठी प्रयत्न
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 12- जिल्ह्यात स्थानिक पातळीवर पर्यटन वाढविणे गरजेचे असून यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रय} सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा लेणीला भेट देण्यासाठी येणारे पर्यटक हे जळगावमार्गे येण्यासाठी जळगाव येथून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी लागणा:या सर्व प्रशासकीय परवानग्या देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) जिल्हा कार्यालय होण्यासाठी प्रय} करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिका:यांनी सांगितले.
5 ते 25ऑक्टोबर या कालावधीत देशात ‘पर्यटन पर्व’ साजरा करण्यात येत आहे. या संकल्पनेचा भाग म्हणून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत पर्यटन पर्व कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे-पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक नितिन मुंडावरे, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, आर्यन पर्यावरण पर्यटन केंद्राच्या डॉ. रेखा महाजन, गांधी रिसर्च फाउंडेशनचे भुजंग बोबडे यांच्यासह ट्रॅव्हल एजंटस्, टूर ऑपरेटर, हॉटेल चालकांचे प्रतिनिधी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी निंबाळकर म्हणाले की, जिल्हयात मोठय़ा प्रमाणात जुनी पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांना भेटी देण्याकरीता पर्यटकांना प्रोत्साहित करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रय} करण्यात येणार आहे.
जिल्हयातील पर्यटन स्थळांची नागरीकांना माहिती व्हावी यासाठी वेबसाईट सुरु करावी, जिल्हयातील सर्व पर्यटनस्थळांना पर्यटकांना भेट देता यावी यासाठी जळगाव दर्शन बस सुरु करावी, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना इतर सर्व पर्यटनस्थळांची माहिती एकत्रित मिळावी यासाठी फलक लावणे, जिल्हयात पर्यटनाला चालना मिळावी यासाठी खान्देश महोत्सव, भरीत पार्टीसारखे महोत्सव सुरु करावेत, मेहरुण तलाव येथे बोटींग सुरु करणे आदी सूचना विविध संस्थांच्या प्रतिनिधीनी बैठकीत मांडल्या. नितिन मुंडावरे यांनीदेखील मार्गदर्शन केले.
अनाथ, अपंग मुलांना गांधीतीर्थ येथे पर्यटन सहल घडविली जाणार
‘पर्यटन पर्व’ कार्यक्रमांत स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय यांच्या संयुक्तविद्यमाने व पर्यटन क्षेत्राशी निगडीत व्यावसायिकांच्या सहकार्याने स्थानिक कला, संस्कृती, पाककृती व पर्यटन स्थळे यांची ओळख घडविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व हॉटेल टुरिस्ट जळगाव ओम असोसिएटसचे दिलीप पंजाबी, नवीन ठक्कर व पर्यटन महामंडळ यांच्या संयुक्तविद्यमाने जिल्ह्यातील अनाथ, अपंग मुलांना गांधीतीर्थ येथे पर्यटन सहल घडविली जाणार आहे.
निबंध स्पर्धा
पर्यटन विकास महामंडळातर्फे शालेय विदयाथ्र्यासाठी अद्भुत महाराष्ट्र प्रवास वर्णन या विषयावरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये विभागातील प्रत्येक जिल्ह्यातून विजेते निवडले जाणार आहेत. विजेत्यांना महामंडळाच्या कोणत्याही एका पर्यटन निवासात 1 रात्र, 2 दिवस मोफत राहण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पर्यटन स्थळांची माहिती सर्वश्रूत करणेसाठी पर्यटकांसाठी स्पॉट क्विज स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
‘पर्यटन पर्व’ कार्यक्रमात स्थानिक पर्यटकांनी मोठय़ा प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निंबाळकर व प्रादेशिक व्यवस्थापक मुंडावरे यांनी केले आहे.