धनगर समाजाच्या पारंपरिक भुंजेरीया सणाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 10:45 PM2019-08-07T22:45:13+5:302019-08-07T22:47:30+5:30

आखतवाडे येथे धनगर समाज बांधवांच्या पारंपरिक भुंजेरीया सणाला प्रारंभ झाला.

Start of the traditional Bhujeriyas festival of Dhangar community | धनगर समाजाच्या पारंपरिक भुंजेरीया सणाला प्रारंभ

धनगर समाजाच्या पारंपरिक भुंजेरीया सणाला प्रारंभ

Next
ठळक मुद्देआखतवाडे येथे धनगर समाज बांधवांचा पारंपरिक भुंजेरीया सण सुरूनागपंचमीपासून सुरू झालेल्या या उत्सवाची रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी सांगता

खडकदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव : तालुक्यातील आखतवाडे येथे धनगर समाज बांधवांच्या पारंपरिक भुंजेरीया सणाला प्रारंभ झाला. नागपंचमीपासून सुरू झालेल्या या उत्सवाची रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी सांगता होईल.
धनगर समाजात या सणाची ऐतिहासिक परंपरा आहे. नागपंचमीच्या दिवशी बांबूच्या काड्यांनी बनवलेल्या पाच कंड्यांमध्ये गहू, भात, मका इत्यादी पाच प्रकारचे धान्य पेरले जातात.
या कंड्यांनाच धनगर समाजाने आपली ‘धना’ नावाची ‘मुलगी’ मानलेली असल्याची धनगर समाजात आख्यायिका आहे. आज पेरलेल्या धनाला धनगर समाजातील घराघरात नारळी पौर्णिमेच्या दिवसापर्यंत पूजा आणि नैवैद्य दाखवले जातात. रक्षाबंधनाच्या दुसºया दिवशी नदीच्या पात्रात गावातील चौकाचौकातून मोठ्या उत्साहात वाजत गाजत धनांना एका टोपलीत ठेऊन नदीच्या पात्रात बिदाई केली जाते.
हा सण आखतवाडेसह परिसरातील बदरखे, मोहळाई, कुसुंबा, ता.धुळे यासह कन्नड तालुक्यातील धामणी, दहीगाव, जामडी तसेच शिसारखेडे, उपली, मांडगाव, डोंगरगाव, पिंपळगाव, चिंचखेडा, आव्हाणे, दहीगाव, बोरगाव कासारी, पाबलवाडी, माहाळ सावंगी, हरसूल, पडेगाव, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, लातूर, बीड, सांगली आणि मुंबई व ठाणे, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, बदलापूर, डोंबिवली, पार्ले, अंधेरी, बांद्रा आदी ठिकाणी नोकरीनिमित्ताने स्थानिक झालेल्या खकन्देशी धनगर समाज बांधव हा सण आजही पारंपरिक पद्धतीने उत्साहात हा सण साजरा करतो.

Web Title: Start of the traditional Bhujeriyas festival of Dhangar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.