भुसावळ तालुक्यात वृक्ष लागवड मोहिमेला धडाक्यात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 08:02 PM2018-07-13T20:02:33+5:302018-07-13T20:08:08+5:30

राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत भुसावळ तालुक्यातील २० गावांमध्ये साडे दहा हजारावर वृक्षांची लागवड करण्यात आली असून या मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

 Start of tree planting campaign in Bhusawal taluka | भुसावळ तालुक्यात वृक्ष लागवड मोहिमेला धडाक्यात प्रारंभ

भुसावळ तालुक्यात वृक्ष लागवड मोहिमेला धडाक्यात प्रारंभ

Next
ठळक मुद्दे२० गावांमध्ये आतापर्यंत १०^,६१८ इतक्या वृक्षांची लागवडगेल्या वर्षी लागवड केलेल्या वृक्षांचे झाले काय? जाणकारांचा सवाल

आॅनलाईन लोकमत
भुसावळ, दि.१३ :  शासनाने राज्याला जुलै महिन्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यात भुसावळ तालुक्याला ४३ हजार ८७५ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले असून यामुळे संपूर्ण तालुका उद्दिष्ट पूर्ण झाल्यास हिरवागार होणार आहे. दरम्यान, तालुक्यातील ३९ पैकी २० गावांमध्ये आतापर्यंत १०^,६१८ इतक्या वृक्षांची लागवड करण्यात आली असून या मोहिमेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
तालुक्यातील ३९ गावांमध्ये प्रत्येक गावात ११२५ प्रमाणे झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पैकी या २० गावांमध्ये वृक्ष लागवड कमी-जास्त प्रमाणात झालेली आहे.
आचेगाव, सुसरी आणि टहाकळी या तीन गावांनी ११२५ झाडांचे उद्दिष्ट जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पूर्ण केले आहे.
इतर गावांची आजपर्यंतची वृक्ष लागवडची स्थिती अशी आहे.
आचेगाव -११२५, बेलव्हाय- ६१२, गोजोरे -५२४, काहुरखेडे- ६८५, किन्ही- २०, कुºहे (प्र.न.) ७४९, खडका-५०, मांडवेदिगर ८४६, शिंदी- ८२४, सुनसगाव-१०, सुसरी-११२५, साकेगाव-१५, साकरी-२३८, टहाकळी-११२५, तळवेल -५३६, वराडसीम-८२४, ओझरखेडे- ५३२, वेल्हाळा- १६८, वांजोळा- ३७५.
दरम्यान, वृक्ष लागवडीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाल्यास तालुका हिरवागार होईल, असे आशादायक चित्र निर्माण झाले असून वृक्ष लागवड करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्यांचे संवर्धन करणे हे देखील महत्त्वाचे आहे. याकडेही शासनाने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे व मागील वर्षी लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी किती वृक्षांचे संवर्धन झाले याचा देखील हिशोब जुळवून पाहावा असे जाणकारांमध्ये बोलले जात आहे.

 

Web Title:  Start of tree planting campaign in Bhusawal taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल