बोरखेडे बुद्रूक येथे जलसंधारण कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 11:06 AM2021-05-04T11:06:06+5:302021-05-04T11:06:36+5:30

मिशन ५०० कोटी जलसाठा अभियान सुरू करण्यात आले आहे.

Start of water conservation work at Borkhede Budruk | बोरखेडे बुद्रूक येथे जलसंधारण कामास प्रारंभ

बोरखेडे बुद्रूक येथे जलसंधारण कामास प्रारंभ

Next



गणेशपूर, ता.चाळीसगाव : मिशन ५०० कोटी लीटर जलसाठा अभियानांतर्गत चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडे बुद्रुक येथे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

ईडीचे सहआयुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण यांच्या प्रेरणेने शेखर निंबाळकर व तुषार निकम यांच्या मार्गदर्शनाखाली जलमित्र विलास पाटील यांच्या प्रयत्नातून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात आली.

कोरोनाच्या बिकट परिस्थितीतही भारतीय जैन संघटना व नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गाव दुष्काळमुक्त व पाणीदार करण्याचे उद्दिष्ट हाती घेतले आहे. गाव शिवारात लोकसहभागातून जलसंधारणाचे काम मागील वर्षापासून सुरू आहे. मिशन ५०० कोटी लीटर जलसाठा अंतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे.

याप्रसंगी गाव समन्वयक विलास पाटील, अरूण पाटील, नाना पाटील, साहेबराव चित्ते, प्रवीण पाटील, संदीप पाटील, प्रज्वल पाटील व ऑपरेटर संतोष राठोड उपस्थित होते.

Web Title: Start of water conservation work at Borkhede Budruk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.