‘आयएमए’च्या राज्यस्तरीय परिषदेला जळगावात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:38 PM2017-08-05T12:38:30+5:302017-08-05T12:39:42+5:30

वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन उपचार पद्धती, नवीन तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन

The state council of the IMA starts in Jalgaon | ‘आयएमए’च्या राज्यस्तरीय परिषदेला जळगावात सुरुवात

‘आयएमए’च्या राज्यस्तरीय परिषदेला जळगावात सुरुवात

Next
ठळक मुद्देसकाळी डॉक्टरांसाठी मार्गदर्शन सत्रवैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन उपचार पद्धती, नवीन तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन परिषदेला राज्यभरातून 600 डॉक्टर उपस्थित

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 5 - इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र आणि आयएमए जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘अॅम्सकॉन 2017’ या अॅॅकॅडमी ऑफ मेडिकल स्पेशालिटी यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे 5 ऑगस्ट रोजी जळगावात आयोजन करण्यात आले आहे. सकाळी डॉक्टरांसाठी आयोजित मार्गदर्शन सत्रात वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन उपचार पद्धती, नवीन तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन करण्यात आले. 
5  व 6 ऑगस्ट रोजी जळगावात हॉटेल कमल पॅराडाईज येथे आयोजित या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी  सकाळी 9 वाजता  या परिषदेला सुरुवात झाली. या वेळी आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, कोषाध्यक्ष डॉ. पार्थिव संघवी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जळगाव आयएमएचे अध्यक्ष डॉ. विश्वेश अग्रवाल, सचिव डॉ. राजेश पाटील, सहसचिव डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. राज नगरकर, डॉ. एन.एस. आर्वीकर यांच्यासह राज्यभरातील  डॉक्टर उपस्थित होते. 
या वेळी मेंदू व ह्रदय विकारावरील उपचारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. 
दुपारी 4 वाजता  आयएमएचे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांच्याहस्ते   उदघाटन सोहळा होणार आहे.
या  परिषदेला राज्यभरातून 600 डॉक्टर उपस्थित राहणार आहे.  या परिषदेच्या आयोजनाचा बहुमान प्रथमच जळगाव आयएमएला मिळाला असल्याचे सचिव डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले.  या परिषदेला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

Web Title: The state council of the IMA starts in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.