राज्य सर्वबाजुने अडचणीत - सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 06:50 PM2018-02-21T18:50:16+5:302018-02-21T18:50:55+5:30
पत्रपरिषद
Next
ठळक मुद्देराजा तुपाशी अन् जनता उपाशीशेतक:यांसाठी नाही पण जाहिरातबाजीसाठी आहे सरकारकडे पैसा
ज गाव- शेतक:यांना कर्जमाफी नाही, बोंडअळीची भरपाई नाही, उद्योग क्षेत्रातही आम्ही मागे पडलो, कुपोषणामुळे बालमृत्यूचे वाढले आहते. एकेकाळी नंबर वन असलेले महाराष्ट्र राज्य आज सर्वच बाबतीत अडचणीत आले आहे तसेच पिछाडीवर पडले आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे पत्रपरिषदेत केली. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने त्या जिल्ह्यात आल्या असून बुधवारी सकाळी राष्ट्रवादी कार्यालयात ही पत्रपरिषद झाली. राजा तुपाशी अन् जनता उपाशीसरकारमुळे त्रस्त झालेली जनता मंत्रालयात आत्महत्या करीत असल्याने त्या रोखण्यासाठी मंत्रालयातही जाळ्या बसवाव्या लागल्या. जेथे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बसले त्या इमारतीला आज जाळी बसवावी लागले आहे, याचे वाईट वाटते आहे. महागाई आणि बोरोजगारी वाढली असून ‘राजा तुपाशी अन् जनता उपाशी अशी आजची स्थिती असल्याची टिकाही सुळे यांनी केली. शिक्षणाचा अधिकार हिरावला जात आहेडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे सर्वाना शिक्षणाचा अधिकार दिलेला असतांना, राज्य सरकार अनेक शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे. अशाप्रकारे गरीबांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेण्याचा शासनाला काय अधिकार आहे? असा सवालही सुळे यांनी उपस्थित केला. लोकांच्या अपेक्षांचे ओङो घ्यावे लागणार हल्लाबोल यात्रेदरम्यान लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत. लोकांच्या अपेक्षांचे ओङो आम्हाला घ्यावे लागणार आहे. यामुळे या प्रतिसादाचे ‘टेन्शन’ही आहे. मतांच्या अपेक्षेने ही यात्रा नसून सध्याचे राज्यकर्ते नाकर्ते आहेत म्हणून आम्हाला निवडून यायचे नाही, तर आम्ही चांगले आहोत म्हणून आम्हला निवडून यायचे आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. शेतक:यांसाठी नाही पण जाहिरातबाजीसाठी आहे सरकारकडे पैसाशेतक:यांच्य कजर्माफीसाठी तसेच त्याच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिरातबाजीवर कोटय़वधी रुपये खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, अशी टिकाही सुप्रिया सुळे यांनी केली. ‘बेटी बचाव’ अभियानाच्या जाहिरातींसाठीही प्रचंड पैसा खर्च केला मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट महाराष्ट्रात स्त्रीजन्म दर हा आता घटला आहे. लहान मुलीने दिलेली केळी ही सर्वात मोठी भेटसुप्रिया सुळे यांनी यावेळी एक अनुभवही सांगितला. रावेर येथील सभा आटोपून रस्त्याने जात असताना एक लहान मुलगी रस्त्याच्या कडेला तिच्या वडिलांसोबत उभी होती. तिने आमच्या गाडय़ांना हात दिला. मी गाडी थांबवली असताना तिने केळीची फणी भेट देवून सांगितले ताई आमच्या केळीला योग्य भाव मिळत नसून योग्य भाव मिळवून द्या. मुलीला असलेली चिंता पाहून मन गहिवरल्याचे सुळे यांनी सांगतले तर तिने दिलेली केळीची भेट सर्वात मोठी वाटली, असेही त्यांनी सांगितले.