जळगाव जिल्ह्यातील पल्लवी जोशी व किशोर पाटील यांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 10:14 PM2017-09-12T22:14:08+5:302017-09-12T22:14:08+5:30
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून देण्यात येणाºया राज्य शिक्षक पुरस्कारांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील भिलवस्ती गालापूर जि.प.शाळेचे प्राथमिक शाळेचे शिक्षक किशोर रमेश पाटील-कुंझरकर व जळगावातील ला.ना.सार्वजनिक विद्यालयाच्या संस्कृत शिक्षीका पल्लवी मिलिंद जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
लोकमत आॅनलाईन,
जळगाव-दि.१२,शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून देण्यात येणाºया राज्य शिक्षक पुरस्कारांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील भिलवस्ती गालापूर जि.प.शाळेचे प्राथमिक शाळेचे शिक्षक किशोर रमेश पाटील-कुंझरकर व जळगावातील ला.ना.सार्वजनिक विद्यालयाच्या संस्कृत शिक्षीका पल्लवी मिलिंद जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाºया व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाºया शिक्षकांचा सन्मान राज्य शासनाकडून दरवर्षी केला जातो. मंगळवारी राज्य शासनाकडून राज्यातील १०७ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील दोन शिक्षकांचा समावेश आहेत. राज्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या जिल्ह्यातील शिक्षकांचा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील व माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी अभिनंदन केले आहे.
पल्लवी जोशी
ला.ना.शाळेत संस्कृत शिक्षीका असलेल्या पल्लवी जोशी यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. तसेच त्यांनी तयार केलेल्या संस्कृत भाषेतील नाटीकांव्दारे शाळेला राज्यस्तरावर अनेक पारितोषिक मिळाले आहेत. ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत त्यांनी शालेय स्तरावर कार्य केले असून, विशेष म्हणजे मुलींच्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत त्यांनी विशेष कार्य केले आहे. यासह विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धांचे देखील आयोजन त्यांनी केले आहे. त्यांना लिखाणाची आवड असून, अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रसिध्द झाले आहेत.
किशोर पाटील-कुंझरकर
जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढावी म्हणून विशेष अभियान राबविले. तसेच स्वत:च्या मुलांचा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश दिला आहे. जि.प.शाळेत सेमी इंग्रजीचे उपक्रम राबविणारे किशोर पाटील हे राज्यातील पहिले शिक्षक आहेत. सध्या एरंडोल तालुक्यातील भिलवस्ती गालापूर जि.प.शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.