जळगावच्या विकास कामांसाठी राज्य शासन आणखी १०० कोटींंचा निधी देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 06:57 PM2018-10-08T18:57:45+5:302018-10-08T19:01:07+5:30

सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत द्यावा लागणारा महापालिकेचा हिस्सा राज्य शासन उचलणार

State government will fund another 100 crore | जळगावच्या विकास कामांसाठी राज्य शासन आणखी १०० कोटींंचा निधी देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगावच्या विकास कामांसाठी राज्य शासन आणखी १०० कोटींंचा निधी देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next
ठळक मुद्देभविष्यातील पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता आतापासून पिण्याचे पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचनासमांतर रस्त्यांचा डीपीआर तयार करण्याबाबत सूचना

जळगाव : सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत जळगाव शहरात विविध विकास कामे करण्यासाठी राज्य शासन विशेष बाब म्हणून शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार आहे. या अभियानातंर्गत राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीच्या ३० टक्के हिस्सा महापालिकेने देणे आवश्यक आहे. परंतु जळगाव शहर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने महानगरपालिकेचा हिस्साही राज्य शासनच उचलेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा सोमवारी येथील जिल्हा नियोजन भवनात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, खासदार ए. टी. पाटील, महापौर सीमा भोळे, आमदार स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, संजय सावकारे, शिरीष चौधरी, सुरेश भोळे, उन्मेश पाटील, चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य शासनाने शहरातील मुलभूत सुविधांच्या विकास योजना राबविण्यासाठी महापालिकेस यापूर्वीच २५ कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. या निधीचा वापर करताना शहरातील मुलभूत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्या. त्याचबरोबर सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत शहरातील रस्ते व गटारींची कामे करण्यासाठी राज्य शासन १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देणार आहे. या निधीतून शहरात करावयाच्या विकास कामांसाठी महासभेने लवकरात लवकर मान्यता देऊन सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करावा. या प्रस्तावास शासन तातडीने मंजूरी देईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या निधीतून शहरातील प्रमूख रस्त्यांची कामे हाती घ्यावीत. ही कामे करतांना अगोदर गटारीची कामे पूर्ण करावी व त्यानंतर रस्तयांची कामे करावी. शहरातील प्रमुख रस्ते हे डांबराऐवजी सिमेंट कॉक्रीटीकरणाची करावीत. शहरात अमृत अभियानातंर्गत पाणी पुरवठा योजना व मलनि:स्सारणचे काम सुरु आहे. हे काम सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करावेत तसेच शहरात हरित क्षेत्र निर्माण करताना पर्यावरण पूरक पाथ वे तयार करावेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (शहरी) घरकुलांचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात आला आहे. तथापी, जळगाव शहर झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी शहरात किमान १० हजार घरे बांधण्याबाबतचे नियोजन करुन तसा प्रस्ताव शासनास सादर करा. भविष्यातील पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता आतापासून पिण्याचे पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्यात. तसेच शिवाजीनगर उड्डाणपूलाचे काम, समांतर रस्त्यांचा डीपीआर लवकरात लवकर तयार करण्याबाबतही त्यांनी यंत्रणेला सूचना दिल्यात. त्याचबरोबर शहराच्या विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी बैठकीत सांगितले.
यावेळी महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी शहरातील विकास कामांबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Web Title: State government will fund another 100 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.