शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य शासनाची वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:12 AM2021-06-23T04:12:13+5:302021-06-23T04:12:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बळीराजा हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतक-यालाच केंद्रबिंदू मानून आपली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बळीराजा हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतक-यालाच केंद्रबिंदू मानून आपली वाटचाल केली आहे. तसेच रुंद सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावात असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. सोमवारी ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजीत कृषी संजीवनी उपक्रमाच्या उदघाटनपर कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतक-यांना बांधावर खत वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी संभाजी ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, कृषिभूषण शेतकरी अनिल सपकाळे, भादली बु. येथील सरपंच मिलिंद चौधरी, नवनिर्मिती शेतकरी मंडळ असोदाचे शेतकरी किशोर चौधरी उपस्थित होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते रुंद सरी वरंबा पद्धतीचे व्हिडिओचे अनावरण करून माहिती दिली. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने यावेळी आसोदा व भादली बु. येथील शेतकरी गटांना बांधावर खत वाटप देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.