राज्य शासनाचा बालकवी पुरस्कार विलास मोरे यांना प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 01:51 PM2021-02-20T13:51:32+5:302021-02-20T13:52:01+5:30
एरंडोल : महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण वाङ्मयय पुरस्कारातील बालवाङ्मयातला बालकवी पुरस्कार कवी विलास मोरे यांना महाराष्ट्र राज्य ...
एरंडोल : महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण वाङ्मयय पुरस्कारातील बालवाङ्मयातला बालकवी पुरस्कार कवी विलास मोरे यांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सहायक अधिकारी अमोल शिरफुले यांनी कवी यांच्या निवासस्थानी येऊन सन्मानपूर्वक प्रदान केला.
याप्रसंगी "शाळेला सुट्टी लागली रे " या बालकविता संग्रहाला मिळालेल्या या पुरस्कारात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रक्कम रूपये ५० हजार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी बोलताना कवी विलास मोरे यांनी राज्य शासन प्रति कृतज्ञता व्यक्त करत आपल्या साहित्य प्रवासाविषयी मनोगत व्यक्त केले.
अमोल शिरफुले यांनी कवी विलास मोरे यांच्या साहित्याबद्दल मनोगत व्यक्त करताना त्यांच्या साहित्य वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
कवी डॉ.मिलींद बागुल, माजी नगराध्यक्ष देवीदास महाजन, शालिक गायकवाड, ॲड.मोहन शुक्ला यांनी मनोगते व्यक्त केली.
सूत्रसंचालन अरूण माळी यांनी, तर आभार युवराज माळी मानले.
कार्यक्रमास डीडीएसपी महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील, विजय महाजन, युवराज खोकरे, विनायक मोरे, प्रीती मोरे, विनोद पाटील, जयश्री मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.