चाळीसगावी मराठा क्रांती मोर्चाने काढली राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 04:28 PM2018-08-03T16:28:01+5:302018-08-03T16:29:00+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी
चाळीसगाव, जि.जळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे मेगा भरती थांबवावी आदी मागण्यांसाठी चाळीसगाव येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ३ रोजी ११ वाजता राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. या वेळी सिन्गल चौकातून घोषणाबाजी करत मोर्चा थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात शांततेच्या मागारने ५८ मूकमोर्चे काढण्यात आले. चाळीसगावमध्येही अशाचप्रकारे मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी शांततेत आंदोलन मोर्चे काढण्यात आले होते. तरीही शासन याबाबत उदासीन असल्याने त्याचा निषेध करत कायगाव टोका येथे जलसमाधी आंदोलना दरम्यान काकासाहेब शिंदे यांचे आत्मबलीदान झाल्याने मराठा समाज हा राज्यात आक्रमक झाला. त्यानंतरही मराठा समाजाच्या सात बांधवांनी आरक्षण नसल्याने आपली प्राणाची आहुती दिली. एवढे मोठे बलीदान होऊनही शासन दखल घेत नाही म्हणून राज्यात मराठा क्रांती मोर्चाने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनात सहभागी होऊन आज राज्य शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. या दरम्यान आत्मबलीदान झालेल्या मराठा तरुणांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
शहरातील सिग्नल चौकात राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. या वेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सिग्नल चौकात सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यासाठी तिरडी आणताच पोलिसांनी हस्तक्षेप करून तिरडी ताब्यात घेतल्याने आंदोलक व पोलीस प्रशासनामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस प्रशासनाचा निषेध करत आंदोलक सिग्नल चौकात ठिय्या आंदोलन करून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर प्रचंड घोषणाबाजी करून मराठा आरक्षणासंदर्भात आपल्या मागण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना पोलिसांनी ठोकाची भूमिका घेऊन आंदोलनात हस्तक्षेप केल्याने नाराजी व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी दिलगिरी व्यक्त केली.
९ आॅगस्टपर्यंत आरक्षण न मिळाल्यास आत्मबलीदान करणार असल्याचा इशारा स्वातंत्र्यसैनिक मनोहर देशमुख यांनी, याठिकाणी राज्य सरकारला दिला.
आंदोलनात गणेश पवार, प्रमोद पाटील, खुशाल पाटील, अरुण पाटील, दीपक पाटील, भैयासाहेब पाटील, राहुल पाटील, संजय कापसे, योगेश पाटील, अतुल पाटील, नीलेश पाटील, शरद पाटील, भाऊसाहेब सोमवंशी, दिनकर कडलग, प्रकाश पाटील, गोपाल देशमुख, राजू पगार, भावडू पाटील, भाऊसाहेब पाटील, अजय पाटील, किशोर पाटील, अतुल गायकवाड, सुनील निंबाळकर, संजय नवले, एकनाथ जगताप, पवन पवार, मंगेश पवार, अमोल पाटील, प्रशांत अजबे, मंगेश देठे, श्याम देशमुख, संदीप पाटील, विजय शितोळे, अॅड. सागर पाटील, प्रदीप अहिरराव, सुनील पाटील, राकेश निकम, ज्ञानेश्वर कोल्हे, अभिषेक पाटील, जयदीप पवार, गणेश पाटील, जगदीश चव्हाण, दिनेश गायकवाड, भूषण खैरनार, प्रतीक पाटील, अनिकेत शिंदे, समीर देठे, भैयासाहेब रणदिवे, छोटू अहिरे, खुशाल बिडे, बंटी पाटील, अरविंद पाटील, किशोर पाटील, प्रदीप मराठे, समाधान मांडोळे, रवींद्र पाटील, पंकज पाटील, योगेश पाटील, राहुल वाघ, जालिंदर पाटील, भूषण पाटील, किरण पवार, अनिल पाटील, ईश्वर पाटील, मयुर पाटील, राजेश पाटील, संतोष निकुंभ, महेंद्र पाटील, संजय जाधव यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.