चाळीसगाव महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 07:39 PM2020-01-10T19:39:19+5:302020-01-10T19:40:09+5:30
यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने यशवंतराव नारायणराव चव्हाण स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
चाळीसगाव, जि.जळगाव : येथील यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने यशवंतराव नारायणराव चव्हाण स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा दोन प्रकारची होती. एका स्पर्धेसाठी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्राशी निगडित सहा विषय होते, तर दुसऱ्या स्पर्धेसाठी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनाशी निगडित विषय होता.
५७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. पहिल्या स्पर्धा प्रकारात ११ हजारांचे प्रथम पारितोषिक नाशिक येथील विद्यार्थिनी श्रुती बोरस्ते हिने मिळवले. द्वितीय साडेसात हजारांचे पारितोषिक धुळे येथील प्रसाद जगताप या विद्यार्थ्याने मिळवले. तृतीय पाच हजारांचे पारितोषिक सांगली येथील अलिशा मोहिते हिने मिळवले.
दुसºया स्पर्धा प्रकारात इप्पर हेमांगी व सुजाता पाटील यांना प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आले. त्यांना पाच हजार रु. रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सात विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ.एम.बी. पाटील होते. विचारमंचावर प्रमुख अतिथी उच्च न्यायालयाचे न्या.संगीतराव श्यामराव पाटील उपस्थित होते.
मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी माजी प्राचार्य पी. एस. चव्हाण यांनी वक्तृत्व कलेचे गुण वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. याप्रसंगी बा. वि. चव्हाण, डी.वाय.चव्हाण, शशिकांत साळुंखे, शेषराव पाटील] विश्वास चव्हाण, किशोर देशमुख, सुरेश स्वार, सुधीर पाटील, अविनाश देशमुख, पुष्पा भोसले, मनोहर सुर्यवंशी, मा. नानासो. एल. टी. चव्हाण, मा. दादासो. प्रदीप देशमुख, वसंत चंद्रात्रे, भूषण भोसले, महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रा.डॉ.एन.ए.पाटील, प्रा.पी.जी.रामटेके, प्रा.डॉ.एन.पी. गोल्हार, प्रा.डॉ.यु. आर.मगर, प्रा.एम.एस. बेलदार, प्राचार्य डॉ.एस.आर. जाधव, प्राचार्य विकास पाखले, उपप्राचार्य शेखर देशमुख, मुकेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला संस्थेतील आजी-माजी मुख्याध्यापक, प्राध्यापक बंधू-भगिणी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
स्पधेर्चे प्रायोजकत्व डी. वाय.चव्हाण, पी.आर. महाले, पंढरीनाथ निकम, के.एम. पाटील, व्ही. बी. मोरे, रवी पाटील, शरद पाटील, अशोक बागड, दिलीप देशमुख, . बाळासाहेब विठ्ठलराव वाबळे आदींनी स्वीकारले होते. परीक्षक म्हणून प्रा.रामजी यशोद, विकास नवाडे व उदय येश होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. जाधव यांनी केले. अतिथी परिचय प्रा.टी.सी.चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.टी.सी. चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.विकास पाखले यांनी केले. समारोपप्रसंगी बक्षीस वितरण ए.पी. जाधव, प्रा.पी.एस.चव्हाण, डॉ.विनोद कोतकर यांच्या हस्ते झाले.