राज्यस्तरीय शिवगान स्पर्धेत मू.जे. महाविद्यालय तिसऱ्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:23 AM2021-02-23T04:23:38+5:302021-02-23T04:23:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भाजपच्या सांस्कृतिक सेलने शिवजयंतीनिमित्त सातारा येथे आयोजित केलेल्या शिवगान स्पर्धेत जळगावच्या मू.जे. महाविद्यालयाने ...

In the state level Sivagan competition, M.J. College third place | राज्यस्तरीय शिवगान स्पर्धेत मू.जे. महाविद्यालय तिसऱ्या स्थानी

राज्यस्तरीय शिवगान स्पर्धेत मू.जे. महाविद्यालय तिसऱ्या स्थानी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भाजपच्या सांस्कृतिक सेलने शिवजयंतीनिमित्त सातारा येथे आयोजित केलेल्या शिवगान स्पर्धेत जळगावच्या मू.जे. महाविद्यालयाने तिसरे स्थान पटकावले आहे. या स्पर्धेत तब्बल ७८ संघ अंतिम फेरीत पोहचले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार चंद्रकांत पाटील व उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पार पडले.

या स्पर्धेत समूह गायनातील विजेता सामगंध कला केन्द्र, पनवेल, जि. रायगड ठरले. तर दुसरे पारितोषिक शिव कल्याण राजा संघ, बीड आणि तिसरे स्थान मू.जे. महाविद्यालय, जळगावने पटकावले. उत्तेजनार्थ क्रमांक गंधर्व पृथ्वीराज माळी, सांगली आणि स्वरश्री, ठाणे यांनी पटकावले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक शैलेश गोजमगुंडे यांच्यासह पंकज चव्हाण, उमेश घळसासी, गीतांजली ठाकरे, संचित यादव, राहुल वैद्य, सुनील सिन्हा, संजय भाकरे, विशाल जाधव, कुणाल गडेकर, नरेंद्र आमले, दीपक पवार, मयूर राजापुरे, काजल राऊत, चैत्राली घळसासी, शिरीष चिटणीस, वैशालीराजे घाडगे व साताऱ्याच्या सांस्कृतिक सेलने मेहनत घेतली.

Web Title: In the state level Sivagan competition, M.J. College third place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.