नवीन कर्जाबाबत खुद्द राज्यमंत्री कांबळे अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 04:30 PM2018-10-30T16:30:59+5:302018-10-30T16:33:33+5:30
अपंग कल्याण महामंडळामार्फत यंदाच्या आर्थिक वर्षात कर्जवाटप थांबविण्यात आले आहे. मात्र याबाबतची माहिती खुद्द सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना येथील आढावा बैठकीतच समजली.
जळगाव : अपंग कल्याण महामंडळामार्फत यंदाच्या आर्थिक वर्षात कर्जवाटप थांबविण्यात आले आहे. मात्र याबाबतची माहिती खुद्द सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना येथील आढावा बैठकीतच समजली. याबाबत कांबळे यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत चुकीचे निर्णय घेणाºया अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृहात राज्यमंत्री कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
जि. प. ला निधी मिळाला, पण खर्च झाला नाही
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला ६२ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र त्यापैकी केवळ २४ कोटी विविध योजनांवर खर्च झाला. याबद्दलही राज्यमंत्री कांबळे यांनी जाब विचारत निधी केव्हा खर्च करणार असा प्रश्न केला.
चाळीसगाव येथे नवीन वसतिगृह तातडीने सुरू करा
चाळीसगाव येथे २०० निवास क्षमतेचे वसतिगृह मंजूर आहे. याठिकाणी जास्तीत जास्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था होण्यासाठी अधिक निवास क्षमतेची इमारत भाड्याने घेण्यात यावी.
शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित ठेवू नये, अशा सूचनाही राज्यमंत्री कांबळे यांनी दिल्या.
यावेळी कांबळे यांनी विविध महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला. अपंग कल्याण महामंडळातर्फे किती कर्ज प्रकरणे झालीत ? असा प्रश्न त्यांनी विचारला असता यंदा कोणतीही प्रकरणे झाली नाहीत. मागील प्रकरणे मार्गी लागल्यावर नवीन प्रकरणे हाती घ्या, म्हणजे पेंडिंग प्रकरणे जास्त दिसणार नाहीत, असे आदेश महामंडळाच्या आयुक्तांनी दिले असल्याची माहिती येथील स्थानिक अधिकाºयांनी मंत्र्यांना दिली. यावर राज्यमंत्री कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत हा चुकीचा इलाज सुचविणाºया अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.