नाहाटा महाविद्यालयात ‘संशोधनाचा आराखडा कसा तयार करावा’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 04:49 PM2018-09-09T16:49:33+5:302018-09-09T16:49:48+5:30
खान्देशातील महाविद्यालयांचा सहभाग
भुसावळ : ‘संशोधनाचा आराखडा कसा तयार करावा’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा येथील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात झाली.
ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक होते. कार्यशाळेचे उद्घाटन उमविच्या व्यवस्थापन विभागाच्या संचालक प्रा.डॉ.सीमा जोशी यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विष्णू चौधरी, प्राचार्या डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, डॉ.एस.व्ही. पाटील, प्रा.एन.ई.भंगाळे, डॉ.बी.एच. बºहाटे, प्रा.व्ही.जी.कोचुरे उपस्थित होते. डॉ. सीमा जोशी यांनी दीपप्रज्वलन केले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ.रामेश्वर चव्हाण यांनी संशोधन आराखड्याची आवश्यकता व महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले, तर डॉ.सीमा जोशी यांनी संशोधन आराखड्याची रूपरेषा कशी तयार करावी याविषयी विचार मांडले. शिरपूरचे डॉ.दिनेश भकड यांनी संशोधन आराखडा तयार करताना असलेल्या साहित्याचा आढावा घेऊन त्याची मांडणी कशी करावी याबाबत सांगितले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ.रश्मी शर्मा यांनी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन पद्धतीविषयी मार्गदर्शन केले. डॉ.एस.पी.झनके यांनी कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन विषय कसा निवडावा, संशोधनाचे प्रकार, सामाजिकशास्त्र संशाधन पद्धती, भाषा व साहित्य यासारख्या विषयांमध्ये संशोधन करू करणाºयांंसाठी प्राथमिक व दुय्यम माहितीचे स्त्रोत कसे निवडावे, संशोधन आराखडा, संशोधनाचे नियोजन याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.एस.डी.येवले यांनी विज्ञानाच्या संशोधक विद्यार्थ्यांना रिसर्च मेथडोलॉजी याबाबत मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात बोदवड येथील प्रा.अरविंद चौधरी यांनी संशोधन कार्यात संशोधन पद्धतीचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास विविध जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांतून प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.बेंडाळे यांनी, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी यांनी केले. वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे, विभागप्रमुख प्रा.व्ही.जी.कोचुरे, प्रा.पी. के. पाटील, प्रा.के.पी.पाटील, प्रा.एम.सी. पाटील, प्रा.डॉ.विलास महिरे, डॉ.किरण वारके, प्रा.डॉ.एम.जे. जाधव, प्रा.स्वाती शेळके, प्रा.प्रियांका वारके, प्रा.भूषण चौधरी, प्रा.जयश्री चौधरी, प्रा.वर्षा पाटील, प्रा.तेजश्री चोरडिया, प्रा.हेमंत सावकारे यांनी परिश्रम घेतले.