हिंदू धर्मात कुटुंब व्यवस्थेला महत्वाचे स्थान, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 01:47 PM2017-12-04T13:47:11+5:302017-12-04T13:48:22+5:30
समाजात कसे रहावे, कसे जगावे आणि कशी सेवा द्यावी, हे कुटुंब व्यवस्थेतून माणूस शिकत असतो. सामाजिक संस्कार इथून घडत असतात, म्हणून हिंदू धर्मात कुटुंब व्यवस्थेला महत्वाचे स्थान आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी धरणगाव येथे केले.
जळगाव- समाजात कसे रहावे, कसे जगावे आणि कशी सेवा द्यावी, हे कुटुंब व्यवस्थेतून माणूस शिकत असतो. सामाजिक संस्कार इथून घडत असतात, म्हणून हिंदू धर्मात कुटुंब व्यवस्थेला महत्वाचे स्थान आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी धरणगाव येथे केले.
धरणगाव येथे सोमवारी सकाळी आयोजित एका विवाह समारंभासाठी ते उपस्थित होते. तिथे वधू- वरांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. या समारंभापूर्वी मोहन भागवत यांनी धरणगाव येथील रा.स्व.संघाच्या जुन्या कार्यकर्त्यांची गुप्त बैठक हेडगेवार नगरातील संघाचे जुने कार्यकर्ते स्व. देवेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी घेतली. यात रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांची उपस्थिती होती.
सामाजिक परिवर्तनाचा वेग वाढवा- मोहन भागवत
संघविचारांच्या कार्याचा प्रभाव सर्वदूर वाढत असून त्यातून झालेले परिवर्तनही दिसत आहे. संघाकडून समाजाची अपेक्षा वाढत आहे. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाचा वेग वाढविण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलं होतं.
महाराष्ट्रातील संघ परिवारातील विविध संस्था व संघटनांच्या कामांचा आढावा, संघटनात्मक वाढ, सेवा कार्यांची स्थिती, पुढील संकल्प याविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राज्यस्तरीय समन्वय बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.