खासगी शाळांचे प्रलंबित प्रतिपूर्तीसाठी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:34+5:302021-07-20T04:12:34+5:30
मागील वर्ष २०१८-१९ पासून आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम शासनाने शाळांना दिली नाही. महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा सर्व निधी देखील प्राप्त झालेला ...
मागील वर्ष २०१८-१९ पासून आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम शासनाने शाळांना दिली नाही. महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा सर्व निधी देखील प्राप्त झालेला आहे. मात्र ती रक्कम अजूनही प्रलंबित आहे. त्याचबरोबर कोरोना व लॉकडाऊनसारख्या परिस्थितीत इंग्रजी खासगी शाळांची परिस्थिती बिकट आहे. शाळांना कुठलीही शासनाची आर्थिक मदत नाही. उलट शैक्षणिक शुल्क वसुलीवरही शासनाने निर्बंध लावले आहेत. अशा परिस्थितीत शिक्षण विभाग व महाराष्ट्र शासन सर्व खासगी विनाअनुदानित शाळांची ही प्रलंबित रक्कम देखील अदा करत नाही. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. संस्थाचालकांवर संस्था बंद करण्याची वेळ आली आहे. यासाठी पारोळा तालुक्यातील इंग्रजी माध्यम शाळांच्या प्रतिनिधीने आपल्या मागण्या व अडचणी मांडण्यासाठी हे निवेदन दिले. गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी निवेदन स्वीकारून शाळेच्या मागण्या व अडचणी वरिष्ठांना जिल्हास्तरावर कळविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
हे निवेदन देताना विजय गायकवाड बोहरा स्कूल पारोळा, विजय बाविस्कर राजीव गांधी स्कूल टेहू, कुंभार महावीर स्कूल आडगाव, बिपीन पाटील आयडियल इंग्लिश स्कूल पारोळा, गुरुकुल स्कूल सावखेडा, धनगर करोडपती स्कूल पारोळा इत्यादी खासगी शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
---
फोटो २०/५