अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामस्थांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:12 AM2021-06-18T04:12:19+5:302021-06-18T04:12:19+5:30

सातगाव डोंगरी हे गाव खान्देश आणि मराठवाड्याच्या हद्दीवर राज्य रस्ता क्रमांक ८४वर वसलेले आहे. या गावाला ऐतिहासिक बाबींची नोंद ...

Statement of the villagers to remove the encroachment | अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामस्थांचे निवेदन

अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामस्थांचे निवेदन

Next

सातगाव डोंगरी हे गाव खान्देश आणि मराठवाड्याच्या हद्दीवर राज्य रस्ता क्रमांक ८४वर वसलेले आहे. या गावाला ऐतिहासिक बाबींची नोंद असून गाव मोठ्या आकाराचे आहे. मात्र, अनेक वर्षांपासून अनेकांनी अतिक्रमण करून गावात प्रवेश करण्याचे रस्तेच जणू काही दाबल्या गेल्याचा काहीसा प्रकार येथे दिसत आहे. आता मात्र ग्रामस्थांनीच एकजूट करून ग्रामपंचायतीला अतिक्रमण हटविण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे. ग्रामपंचायतीने अतिक्रमणधारकावर कारवाई केली नाही तर ग्रामस्थ उपोषणाला बसणार, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी सरपंच भरत राठोड, उपसरपंच रज्‍जाक तडवी, ग्रामसेवक के. डी. पवार, ग्रामपंचायत सदस्य आबा पाटील यांना निवेदन देताना देविदास राजाराम वाघ, ज्ञानेश्वर पुंडलिक अहिरे, सागर अशोक पाटील, गजानन लाधे, योगेश शांताराम पाटील, मधुकर परभत बच्छे, अशोक सांडू पवार, बबलू याकुब पठाण उपस्थित होते.

Web Title: Statement of the villagers to remove the encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.