तूर खरेदी बंदच्या निषेधार्थ चोपडय़ात ठिय्या आंदोलन

By admin | Published: April 29, 2017 04:43 PM2017-04-29T16:43:41+5:302017-04-29T16:43:41+5:30

29 रोजी चोपडा तहसील कार्यालयासमोर तालुका काँग्रेसतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले

Static agitation in Chopdi protested against the purchase of a pirate shop | तूर खरेदी बंदच्या निषेधार्थ चोपडय़ात ठिय्या आंदोलन

तूर खरेदी बंदच्या निषेधार्थ चोपडय़ात ठिय्या आंदोलन

Next

ऑनलाइन लोकमत

चोपडा, जि. जळगाव, दि. 29 -  तूर खरेदी केंद्रावर अद्यापही बहुतांश शेतक:यांची तूर पडून असताना शासनाने नाफेडमार्फत जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्र बंद केल्याच्या निषेधार्थ 29 रोजी  चोपडा तहसील कार्यालयासमोर तालुका काँग्रेसतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड संदीप पाटील, तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, शहराध्यक्ष संजीव बाविस्कर, नंदकिशोर सांगोरे, राजाराम पाटील, देविदास सोनवणे, चुडामण पाटील, अॅड एस. डी. सोनवणे, प्रभाकर बडगुजर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
  यावेळी फडणवीस सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, शेतक:यांची तूर खरेदी झालीच पाहिजे, पेट्रोल-डिङोलची दरवाढ कमी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्यात. त्यानंतर नायब तहसीलदार डॉ. स्वप्नील सोनवणे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  यामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या.

Web Title: Static agitation in Chopdi protested against the purchase of a pirate shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.