व्हॉट्सॲपवरील अफवा आणि उपायांपासून दूर राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:15 AM2021-04-13T04:15:35+5:302021-04-13T04:15:35+5:30
उत्तम, सकस आहार अत्यंत गरजेचा तुमचा आहार कसा, यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय ...
उत्तम, सकस आहार अत्यंत गरजेचा
तुमचा आहार कसा, यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय खातो, या बाबी आपल्या शरीरावर परिणाम करणाऱ्या ठरतात. तेव्हा दिवसभरातील आहार हा पौष्टीक असेल, त्यातून पुरेसे पोैष्टीक सत्व आपल्या शरीराला मिळतील, याची दक्षता घेणे, या दिवसात अधिक महत्त्वाचे ठरते. महत्त्वाची बाब म्हणजे जेवण हे वेळेवरच करावे, यामुळे पचनसंस्था चांगली राहाते आणि त्यामुळे प्रतिकारक्षमता सक्षम राहाते. सकाळी व्यायाम करावा, नाष्टा करावा, नाष्टा करणे कधीही टाळू नये, यातून तुमच्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. बाहेरचे खाणे टाळावे, अधिकाधिक पाणी प्यावे, मानसिकता टिकवून ठेवावी. सकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला आजारातून अर्धा बरा करतो. केवळ योग्य पद्धतीने व डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार पद्धती अवलंबली गेली पाहिजे.
...हे करावे
प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी युनानीचा काढा सकाळ व संध्याकाळ घ्यावा, दिवसातून दोन वेळा वाफ घ्यावी, तसेच अर्क अजीब, इडी, इम्प्युल्स, लऊके सपिस्ता, खमीरा मरवारीद इत्यादी औषधी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे. काही दिवसात ही औषधी इकरा कॉलेजलाही उपलब्ध होणार आहे.
आम्ही काय करतो.
रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर डॉक्टर हा घटक सर्वात हाय रिस्क कॉन्टॅक्ट असतो. मात्र, पुरेशी काळजी घेणे, नियमांचे पालन करणे, या बाबींमुळे सुरक्षितता मिळते. यात सर्वांना अवगत असलेले मास्क वापरणे, पण ते अगदी व्यवस्थित. हात स्वच्छ धुणे, गर्दी टाळणे, लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे, या बाबींवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. हेच तुमचे मोठे शस्त्र आहे.
डॉ. शोएब शेख, उपप्राचार्य, इकरा युनानी मेडिकल कॉलेज