मिनी मंत्रालयाचा कारभारी आज ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 11:58 AM2020-01-03T11:58:59+5:302020-01-03T11:59:30+5:30

भाजप की ‘महाविकास’: अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची उत्सुकता शिगेला, अनेक नावे चर्चेत

The steward of the mini ministry will be here today | मिनी मंत्रालयाचा कारभारी आज ठरणार

मिनी मंत्रालयाचा कारभारी आज ठरणार

Next

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीचा सस्पेंस शुक्रवारी दुपारी संपणार आहे़ भाजपा व महाविकास आघाडीकडून होणाऱ्या दाव्या, प्रतिदाव्यांनी या निवडीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे़ काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादीचे तीन सदस्य भाजपच्या गळाला लागले असून त्यांची संख्या ३८ झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे़ गुरूवारी रात्री उशिरा भाजपचे सर्व सदस्य जळगावात पोहचणार होते़
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ २० सप्टेंबर रोजी संपला होता. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषदेतही त्या हालचाली गतिमान झालेल्या होत्या़ मात्र, एक राष्ट्रवादी, एक शिवेसेनेच्या सदस्या अपात्र ठरल्याने महाविकास आघाडीचे गणित फिस्कटले होते़ मात्र, मंत्री गुलाबराव पाटील व आमदार अनिल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी यात पुढाकार घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत झालेल्या होत्या़ त्यामुळे भाजपनेही काळजी घेत त्यांच्या सदस्यांना रविवारपासून सहलीला पाठविले होते़
असे असेल गणित़़़़़
जळगाव लोकसभा मतदारसंघात उपाध्यक्षपद व एक सभापतीपद तर रावेर लोकसभा मतदारसंघात अध्यक्षपद व तीन सभापती तसेच एक गटनेते अशा पदांची विभागणी माजी आमदार एकनाथराव खडसे यांच्या सोबत झालेल्या बैठकीतच करण्यात आली होती़ शिवाय ज्यांना पदे मिळालेली आहेत, अशांना पुन्हा संधी मिळणार नाहीत, असे खडसे यांनी स्पष्ट केले होते़
त्यामुळे रंजना चव्हाण यांच्या नावाला त्याच वेळी बे्रक लागला होता़
अध्यक्षपदासाठी पल्लवी सावकारे, रंजना पाटील अथवा नंदा पाटील यांची नावे चर्चेत आहेत. आता सामाजिक गणिताचा विचार केल्यास भाजपकडून उपाध्यक्षपदासाठी मधू काटे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.
मान मग पल्लवी सावकारे यांना मिळेल, असे संकेत आहे़ कारण रंजना पाटील यांना अध्यक्षपद मिळाल्यास उपाध्यक्षपदासाठी दुसरा उमेदवारा द्यावा लागणार आहे़ असे झाल्यास मधू काटे हे पदापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने पक्ष सध्या ही रिस्क घेणार नाही़ त्यांचा उपाध्यक्ष पदावर दावा मजबूत असल्याने पल्लवी सावकारे यांचा अध्यक्षपदावर मजबूत दावा असणार आहे़
जळगाव लोकसभा मतदार संघातील लालचंद पाटील यांना सभापतीपद मिळण्याचे संकेत आहे़त़ दरम्यान, पल्लवी सावकारे यांना अध्यक्षपद मिळावे यासाठी सदस्य आग्रही आहेत, सभापती पदासाठी जयपाल बोदडे, रवींद्र पाटील, लालचंद पाटील आदी नावे समोर आलेली आहेत़
दोन सदस्यांची जबाबदारी
काँग्रेसच्या दोन सदस्यांना भाजपकडे आणण्याची जबाबदारी भाजपचे एक जळगावातील पदाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे़ तसेच काँग्रेसचे आरोग्य सभापती दिलीप पाटील हे भाजप सोबत असल्याचे वृत्त समोर आले आहे़

भापजच्या सर्व सदस्यांचे मोबाईल जमा करण्यात आलेले होते़ केवळ जामनेरच्या एका तरूण सदस्यांचा मोबाईल त्यांच्या जवळ होता़ त्यांच्यावर सर्व सदस्यांवर निगराणीची जबाबदारी सोपविण्यात आलेली होती़ सर्व सदस्य त्र्यंबकेश्वर येथे थांबून होते़ गुरूवारी दुपारच्या सुमारास ते जळगावकडे रवाना झाले होते़

भाजपच्या दोन सदस्या वेगळया
राष्ट्रवादीच्या अमळनेरच्या एक सदस्या भाजपसोबत सहलीला असल्याने त्यांच्यावर महाविकास आघाडीकडून दबाव टाकण्यात येत होता़ त्यांना होणार त्रास बघता भाजपच्या दोन महिला सदस्या व राष्ट्रवादीच्या त्या सदस्या अशा तीन सदस्या भाजपच्या या गोटातून वेगळ्या ठिकाणी निघून गेल्या होत्या़ त्याही वेळेवर जळगावात पोहचतील असे सूत्रांनी सांगितल़े

यांचे असतील अर्ज
४भाजपकडून रंजना पाटील व पल्लवी सावकारे, नंदा पाटील तर महाविकास आघाडीकडून जयश्री पाटील यांचे अर्ज राहतील
४उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून मधू काटे, लालचंद पाटील तर महाविकास आघाडीकडून नानाभाऊ महाजन, रावसाहेब पाटील, प्रताप पाटील यांचे अर्ज असण्याची शक्यता आहे़

अशी असेल प्रक्रिया
सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान अर्ज स्वीकारले जातील़ त्यानंतर ३ वाजता अर्जांची छाननी करून वैध अर्जांची घोषणा केली जाईल व दहा मिनिटे माघारीसाठी वेळ दिला जाईल़ त्यानंतर अ,ब़, क़, ड नुसार नावांची घोषणा करून त्यावर उजवा हात उंचावून मतदान घेतले जाईल. हात उंचावलेल्या सदस्यांच्या स्वाक्षºया घेतल्या जातील़ त्यानंतर सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवारांना विजयी घोषित करण्यात येईल, उपाध्यक्ष निवडीसाठीही हीच प्रक्रिया राबविली जाईल. पाच वाजेपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल़

Web Title: The steward of the mini ministry will be here today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.