बुडत्यांना मिळाला काठीचा आधार

By admin | Published: June 21, 2017 01:26 PM2017-06-21T13:26:26+5:302017-06-21T13:26:26+5:30

प्रसंगावधानामुळे दोघे वाचले मात्र बैलांचा मृत्यू

Stick to the stick | बुडत्यांना मिळाला काठीचा आधार

बुडत्यांना मिळाला काठीचा आधार

Next

 ऑनलाईन लोकमत

अमळनेर,दि.21 : बैलांना तापी नदीवर पाणी पाजण्यासाठी  गेलेले दोन तरुण बैलजोडी व गाडीसह पाण्यात बुडत होते. मात्र  दोघांना काठीचा आधार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. या घटनेत दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. ही घटना गंगापुरी (ता.अमळनेर) येथे घडली.
तालुक्यातील गंगापुरी येथील ज्ञानेश्वर रामकृष्ण पाटील (35), सचिन मिलिंद पाटील (17) हे दोघेही बैलगाडी घेवून शेतात जात असताना बैलांना पाणी पाजण्यासाठी तापी नदी काठावर बैलगाडीसह गेले. अचानक बैल पाण्यात पडले. त्याठिकाणी डोह असल्यामुळे बैलगाडीसह दोघेही तरुण पाण्यात पडले. बैल व गाडी बुडू लागली.
 तरुणही वाचण्यासाठी पाण्यात हातपाय हलवून आरडाओरड करु लागले. ही घटना पलीकडच्या काठावरील चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील ग्रामस्थांनाही दिसली. जवळच असणा:या मनोहर धनराज कोळी या मुलाला हे दृश्य दिसताच क्षणात त्याने कपडे काढून पाण्यात उडी मारली. मात्र बुडणा:या तरुणांर्पयत पोहचण्यासाठी त्याचे धाडस होत नव्हते. सुदैवाने त्याचवेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील तेथून वाहनाने जात होते. त्यांना तरूणांची आरडाओरड ऐकू आल्याने तेही वाहन थांबवून घटनास्थळाकडे धावले. परिस्थिती गंभीर पाहून त्यांनी जवळच दोन काठय़ा शोधल्या. एक काठी मनोहरच्या हातात देवून बुडत्यांना आधार दिला व एक काठी मनोहर व त्यांच्यात स्वत:मध्ये आधार म्हणून धरली आणि एकमेकांमध्ये समन्वय साधून  बुडणा:या दोघही तरुणांना बाहेर काढण्यात आले. मनोहर कोळी  व मिलिंद पाटील यांच्या सतर्कतेमुळे ज्ञानेश्वर पाटील व सचिन पाटील हे दोघेही  वाचले. मात्र बैल गाडीला जुंपलेले असल्याने,  बैलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Web Title: Stick to the stick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.