चोपड्यात ‘श्रीं’च्या विसर्जनात लाठीचार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 09:42 PM2019-09-07T21:42:37+5:302019-09-07T21:42:42+5:30

१७ तास चालली मिरवणूक : पोलीस अधीक्षक ठाण मांडून

Sticks charged in 'Shriman' immersion in Chopad | चोपड्यात ‘श्रीं’च्या विसर्जनात लाठीचार्ज

चोपड्यात ‘श्रीं’च्या विसर्जनात लाठीचार्ज

Next




चोपडा : येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पाचव्या दिवशी झालेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलीस कमांडो व गणेश मंडळ कायकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यात कमांडेंनी कार्यकत्यांवर करकोळ लाठीचार्ज केला. त्यामुळे काही अंशी तणाव निर्माण झाला होता.
६ रोजी सकाळी ९.०० वाजेपासून दुसऱ्या दिवशी ७ रोजी पहाटे दोन वाजेपर्यंत अशी १७ तास मिरवणूक चालली. मेनरोडच्या अरुंद गल्लीत गणेश मंडळाचे कार्यकर्ते लेझीम खेळत असताना दाटीवाटी होते. या वर्षी मिरवणूक सुरु आसताना एका गल्लीत रात्री १२ वाजेनंतर वाजंत्री बंद करण्याचे आदेश असल्याने पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी १२ वाजेनंतर उर्वरित गणेश मंडळांची वाजंत्री बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गणेश मंडळ कार्यकर्ते आणि पोलीस पोलीस प्रशासन यांच्यात तेढ निर्माण झाली. बंदोबस्तासाठी बाहेरून आलेल्या कमांडोंनी थेट लाठीचार्ज सुरू केला. यात अनेकांना मार बसला. पोलिसांनी किरकोळ लाठीचार्ज केल्याने काही अंशी तणाव निर्माण झाला होता.हा प्रकार वगळला तर शांततेत विसर्जन मिरवणूक पार पडली.
अनुचित प्रकार घडू नये म्हणून जळगाव येथून पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे हे मुस्तफा बाबा दर्गासमोर मेहमूद बागवान यांच्या घरात ठाण मांडून नजर ठेवून होते.
पोलीस प्रशासनाचा रात्री बारा वाजेपर्यंत गणेश विसर्जन कार्यक्रम आटोपण्याचा मानस होता. मात्र शहराची रचना दाटीवाटीची असल्याने सर्व गणेश मंडळांना रांगेत येण्यासाठीच खूप मोठा वेळ लागतो. विसर्जन मिरवणूक मार्ग अरुंद असल्याने रात्री १० वाजेपर्यंत केवळ पंधरा तर १२ वाजेपर्यंत ३२ गणेश मंडळे मुस्तफा बाबा दर्ग्यापासून पुढे रवाना झाले होते.
मिरवणुकीच्या दिवशी सकाळी नऊ वाजता अनिल वानखेडे यांचा राणी लक्ष्मीबाई गणेश मंडळाचा गणपती सर्वात प्रथम विसर्जन स्थळाकडे रवाना झाला होता. पण मुख्य चावडीजवळ एक गणपती गोल मंदिराकडून आणि एक राणी लक्ष्मीबाई चौकाकडून सोडल्यामुळे मागील गणपतींना बराच वेळ ताटकळत थांबावे लागते.
रात्री बारा वाजेनंतर मात्र पोलिस प्रशासनाने जी मंडळे दिरंगाई करत होते, अशांना पुढे जाण्यासाठी आग्रह धरला.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सौरभ अग्रवाल, जळगाव स्थानिक शाखा पोलीस निरीक्षक बापू रोहोम व त्यांची पूर्ण कुमक, चोपडा शहर पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनावणे, फौजदार रामेश्वर तुरनर व इतर आरसीपी प्लाटूनचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. तसेच बंदोबस्तासाठी बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी चोपडा शहरातील सामाजिक संस्थांतर्फे नाश्ता पुरविण्यात आला होता.
१७ तास चालली मिरवणूक
सकाळी ९ वाजेपासून रांगेत असलेल्या मंडळांना विसर्जनासाठी खूप उशीर झाला. त्यामुळे बंदोबस्तासाठी बाहेरून मागविण्यात आलेल्या कमांडोंच्या लाठीचार्जमुळे विसर्जन मिरवणुकीस गालबोट लागले. रात्री १२ वाजे नंतर वाजंत्री बंद करण्याचे पोलीस कुमकला आदेश दिले. त्यानुसार सर्व पोलीस बंदोबस्तात कार्यशील असलेल्या इतर कर्मचाºयांनी राजमहेंद्र हार्डवेअर या दुकानासमोर असलेल्या मंडळांचे वाजंत्री पथक पोलिसांनी जबरदस्तीने काढून नेले. त्यानंतर उर्वरित सर्व गणेश मंडळातील कार्यकर्ते संतप्त होऊन जागेवरच थांबण्याच्या निर्णयाप्रत आले. त्यानंतर कमांडोंनी मात्र कोणत्याही वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशाशिवाय गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर व मिरवणूक पाहण्यास आलेल्या नागरिकांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर तासभर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नेते व पदाधिकारी, पत्रकार यांनी पोलीस प्रशासनासोबत मध्यस्थी करून तोडगा काढला व पुन्हा वाजत गाजत मिरवणुक सुरू झाली. ईगल क्लब गणेश मंडळाची वाजंत्रीही पोलिसांनी पुढे लोटल्याने या मंडळाचे पदाधिकारीही विनावाजंत्रीने पुढे गेले. त्यानंतरही १५ गणेश मंडळे रांगेत होती.
यांनी केले मोलाचे सहकार्य :
दरम्यान गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना लवकर पुढे काढण्यासाठी माजी आमदार कैलास पाटील, अमृतराज सचदेव, चंद्रहास गुजराथी, गटनेते जीवन चौधरी, शेतकी संघ प्रेसिडेंट शेखर पाटील, भाजप शहर अध्यक्ष रवींद्र मराठे, मगन बाविस्कर, पंकज पाटील, प्रवीण गुजराथी, संजय सोनवणे, सागर तायडे, देवेंद्र पाटील यांचे पोलीस प्रशासनास मोठे सहकार्य लाभले.
गुलालाचा खर्च : कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. रस्ता गुलालाने माखला होता.
महिलांची लक्षणीय उपस्थिती : दरवर्षापेक्षा या वर्षी महिलांची उपस्थिती जास्त होती.

 

Web Title: Sticks charged in 'Shriman' immersion in Chopad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.