अजूनही दमदार पावसाची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:12 AM2021-06-30T04:12:15+5:302021-06-30T04:12:15+5:30
तालुक्यात लागवडीलायक २६ हजार ३४७ हेक्टर आहे. यापैकी खरीपाखाली २६ हजार ३४७ हेक्टर क्षेत्रात खरीपाची लागवड झाली ...
तालुक्यात लागवडीलायक २६ हजार ३४७ हेक्टर आहे. यापैकी खरीपाखाली २६ हजार ३४७ हेक्टर क्षेत्रात खरीपाची लागवड झाली आहे. त्यातील १६ हजार ८८६ हेक्टर क्षेत्रात कपाशीचा पेरा करण्यात आला आहे. शेतकरी उर्वरित खरीपाची ज्वारी, उडीद, मूग, सोयाबीन या पेरणीमध्ये मग्न आहे. तालुक्यात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. अधूनमधून पडत असलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. तालुक्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस पुरेसा नसल्याने वातावरणात उकाडा आहे. तालुक्यातील अजून एकाही नदीला पूर आलेला नाही.
तालुक्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसाची २० मिलिमीटर नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे १४५ मिलिमीटर पाऊस झाला असून, कपाशीची पेरणी पूर्ण झाली आहे.